‘रुग्ण तर वाढतच राहणार, पण लॉकडाऊ वाढवणं हा त्यावर उपाय नाही’

‘रुग्ण तर वाढतच राहणार, पण लॉकडाऊ वाढवणं हा त्यावर उपाय नाही’

देशात आणि महाराष्ट्रात देखील ३१ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. त्यामुळे अजूनही अनेक भागांमध्ये अनेक प्रकारच्या उद्योगधंदे बंद अवस्थेतच आहेत. शिवाय, लोकांना देखील घरीच थांबण्याचे निर्देश कायम आहेत. या पार्श्वभूमीवर रेड झोन, नॉन रेड झोन आणि कंटेनमेंट झोन अशा आधारावर काही भागांमध्ये नियम आणि अटी शिथिल करण्यात आल्या असल्या, तर देखील देशातली आणि राज्यातली वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहाता लॉकडाऊन अजून वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर देशातील आघाडीचे उद्योगपती आणि महिंद्रा अॅण्ड महिंद्र उद्योगसमूहाचे मालक आनंद महिंद्रा यांनी लॉकडाऊनवर आणि लॉकडाऊन वाढवण्यावर देखील नाराजी व्यक्त केली आहे.

काय म्हणाले आहेत आनंद महिंद्रा?

आपल्या ट्वीटर अकाऊंटवर आनंद महिंद्रांनी यासंदर्भात भूमिका मांडली आहे. ‘लॉकडाऊन वाढवणं हे फक्त आर्थिक दृष्ट्या धोकादायक नाही. तर त्यामुळे वैद्यकीय दृष्ट्या देखील एक नवं संकट यातून उभं राहू शकेल. लॉकडाऊनच्या काळात लोकांवर होणारे मानसिक परिणाम हे संकट उभं करू शकतात. कोविड व्यतिरिक्त देखील असणाऱ्या रुग्णांकडे दुर्लक्ष केल्यामुळे देखील हे संकट उभं राहू शकतं. अशा काळात योग्य गोष्टीची निवड करणं हे राज्यकर्त्यांसाठी कठीण असतं. मात्र, लॉकडाऊन वाढवणं हा निश्चितच तो पर्याय असू शकत नाही. कोविड रुग्णसंख्या सातत्याने वाढतच राहणार आहे. आपल्याला रुग्णालय, बेड आणि ऑक्सिजन लाईन वाढवण्यावर फोकस करणं गरजेचं आहे. आपल्या लष्कराकडे या गोष्टीसाठी लागणारं कौशल्य आहे’, असं आनंद महिंद्रा यांनी या ट्वीटमध्ये नमूद केलं आहे.

First Published on: May 26, 2020 12:42 AM
Exit mobile version