Video : ‘ही’ मुलगी पायाने चालवते कार, आनंद महिंद्रा यांनी शेअर केला व्हिडिओ!

Video : ‘ही’ मुलगी पायाने चालवते कार, आनंद महिंद्रा यांनी शेअर केला व्हिडिओ!

पायाने गाडी चालवणारी केरळमधील मुलगी

महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा ट्विटरवर नेहमी सक्रीय असतात. ते नेहमी एखादा महत्त्वपुर्ण व्हिडिओ, फोटो शेअर करून सगळ्यांच लक्ष वेधून घेतात. नुकताच आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर केरळमधील एका मुलीचा व्हिडिओ शेअर केला आहे. या मुलीचं कौतुक म्हणजे तीला हात नसतानाही ती पायाने गाडी चालवते, हात नसतानाही ड्रायव्हिंग लायसन्स मिळवणारी एशियातील ती पहिली महिला ठरली आहे.

ज्यूलिमॉल मेरट थॉमस या मुलीला जन्मत:च हात नव्हते. ती आता २८ वर्षांची आहे. रिमोटच्या माध्यमातून आपल्या गाडीला अनलॉक करण्यासाठी ती पायांचा उपयोग करते. त्यानंतर कारच्या गियरला रिमोटच्या सहाय्याने ड्राईव्ह मोडवर टाकते. आणि त्याच्याच मदतीने स्टेअरिंग, ब्रेक आणि गैस पैडलला नियंत्रीत करते. थॉमसहीने ड्रायव्हिंगसाठी २०१४ मध्ये थोडुपुझा येथील क्षेत्रीय परिवहन अधिकाऱ्याशी संपर्क केला होता.

म्हणून मिळालं लायसन

थॉमसच्या वकिलाने कोर्टात दावा केला की, थॉमस ही स्वतंत्र आणि आत्मनिर्भर मुलगी आहे. वकिलांनी तीचे सर्व रेकॉर्ड कोर्टात जमा केले. त्यानंतर वकिलांचे पुर्ण बोलणं ऐकून कोर्टाने थॉमसला लायसनसाठी अर्ज करायला परवानगी दिली. थॉमसहीचा ड्रायव्हिंग कराताना व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्यात आला होता.

आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत लिहिले आहे की, हा व्हिडिओ बघितल्यानंतर मला खऱ्या अर्थाने साहस या शब्दाचा अर्थ समजला. या व्हिडिओचा कोरोनाशी संबंध नसला तरी या व्हिडिओवरून आपण शिकलं पाहिजे की कितीही मोठं संकट आलं तरी त्याला धीरानं सामोरं जायला हवं.


हे ही वाचा – …आणि एक- एक करून त्याने आपल्या तीनही मुलींना नदीत फेकलं!


First Published on: June 1, 2020 7:53 PM
Exit mobile version