अनंत कुमार यांनी संयुक्त राष्ट्र संघात केले होते कन्नडमध्ये भाषण

अनंत कुमार यांनी संयुक्त राष्ट्र संघात केले होते कन्नडमध्ये भाषण

अनंतकुमार यांनी भाजपच्या सर्व प्रमुख नेत्यांसोबत काम केले.

भाजपजे खासदार आणि केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांच्या निधनाने कर्नाटक भाजपचे नुकसान झाले असल्याची प्रतिक्रिया भाजपचे अनेक नेते देत आहेत. अनंत कुमार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर समर्थक होते. कर्नाटक भाजपता अजातशत्रू असे व्यक्तिवमत्व असलेले अनंत कुमार हे सर्वात लहान वयात केंद्रीय मंत्री झाले होते. तर संयुक्त राष्ट्र संघात कन्नड भाषेत भाषण करणारे पहिले व्यक्ती होते.

वाजपेयींपासून ते मोदींपर्यंत सर्वांच्या जवळ

कर्नाटक भाजपचा महत्त्वाच चेहरा असलेले अनंत कुमार वाजपेयींपासून ते मोदींपर्यंत सर्वच भाजप प्रमुखांच्या जवळ होते. दक्षिण बेंगलुरु मतदारसंघातून ते लोकसभा खासदारपदी निवडूण आले होते. आतापर्यंत सहा वेळा ते संसदेत गेले होते. जुलै २०१६ रोजी त्यांची संसदीय कामकाम मंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली होती. राजकारणाचा बारकाई अभ्यास असलेले अनंत कुमार अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी पासून नरेंद्र मोदी यांच्या कर्नाटक दौऱ्यात ते केंद्रीय नेतृत्वाच्या जवळ होते.

महाविद्यालयात शिक्षण घेत असताना अभाविपमध्ये प्रवेश घेतल्यानंतर त्यांच्या सार्वजनिक जीवनाला सुरुवात झाली. अभाविपचे प्रदेश सचिव या पदापासून ते राष्ट्रीय सचिव होण्यापर्यंत त्यांनी मजल मारली. आणीबाणीच्या काळात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याविरोधात आंदोलन केल्यामुळे त्यांना ३० दिवसांचा तुरुंगवासही झाला होता. १९८७ साली त्यांनी भाजपच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. भाजपमध्येही त्यांनी प्रदेश सचिवपासून राष्ट्रीय सचिव पदापर्यंत मजल मारली. बी. एस. येदियुरप्पा यांच्यासोबत अनंतकुमार यांचे नाव भाजपच्या तळातील नेत्यांमध्ये घेतले जाते.

कमी वयात झाले केंद्रीय मंत्री

अनंत कुमार १९९६ मध्ये पहिल्यांदा दक्षिण बेंगलुरु मतदारसंघातून निवडूण आले. हा मतदारसंघ त्यांचा मजबूत किल्ला मानला जातो. याच मतदारसंघात लागोपाठ सहा वेळा निवडूण येण्याचा विक्रमही त्यांनी केला होता. १९९८ मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये सर्वात कमी वयाचे केंद्रीय मंत्री म्हणून त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली होती.

First Published on: November 12, 2018 12:02 PM
Exit mobile version