Video : अँकरच्या मुलाने लाईव्हमध्ये घातला धुमाकूळ

Video : अँकरच्या मुलाने लाईव्हमध्ये घातला धुमाकूळ

अँकरच्या मुलाने लाईव्हमध्ये घातला धुमाकूळ

लहान मुलं म्हटलं की, त्या मुलांची मज्जा मस्ती ही आलीच. मग त्यांचे ते बोबडे बोल असो किंवा त्यांचा तो लाडिवाळपणा असो. त्यामुळे घरात हसून खेळून वातावरण निर्माण होते. मात्र, हीच मुल ज्यावेळी त्यांच्या पालकांच्या ऑफिसमध्ये जातात. त्यावेळी त्या मुलांची खूपच धमाल असते. मग त्यांना खूप सारे चॉकलेट्स देखील मिळतात. परंतु, मुलांची जरी धमाल असली तरी देखील त्या पालकांची मात्र, चांगलीच पंचायत होते. आई – वडिलांनी जरी अनेका मस्ती करु नको असे सांगितले तरी देखील ही मुल आपल्याला हवे तेच करतात आणि त्यातून अनेकदा भन्नाट किस्से घडतात, अशी एक घटना अमेरिकेत घडली असून सध्या तो व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

काय आहे या व्हिडिओत

अमेरिकेतील एका वृत्तवाहिनीत काम करणाऱ्या कर्टनी क्यूब ही निवेदिका आपल्या लहान मुलाला ऑफिसमध्ये घेऊन गेली होती. त्यानंतर कर्टनी ही सीरियीमध्ये झालेल्या एअरस्ट्राइक विषयीची बातमी देत होती. त्याचवेळी तिचा लहान मुलगा अचानक कॅमेरासमोर येऊन मस्ती करत असल्याचे दिसून येत आहे. तरीदेखील ती आपल्या मुलाला सावरत बातमी सांगण्याचा प्रयतान करत असताना दिसत आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी कर्टनीसह वृत्तवाहिनीचे कौतुक केले आहे. तसेच या वृत्तवाहिनीमध्ये लहान मुलांना सोबत घेऊन जाण्याची परवानगी असल्यामुळे अनेकांनी कौतुक केले आहे.


हेही वाचा – अरे बापरे! मागितली फ्रेंच किस आणि…


 

First Published on: October 11, 2019 5:21 PM
Exit mobile version