दोन हजाराची नोट चलनातून बंद होणार? संसदेत सरकारकडून स्पष्टीकरण

दोन हजाराची नोट चलनातून बंद होणार? संसदेत सरकारकडून स्पष्टीकरण

दोन हजाराच्या नोटा

गेल्या काही महिन्यांपासून दोन हजाराची नोट चलनातून बंद होणार असल्याची चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावर देखील अशाप्रकारचे अनेक मॅसेज फिरत आहेत. विशेष म्हणजे यावर्षी ओक्टोबर महिन्यात दिवाळीच्या काळात अशाप्रकारचे मॅसेज जास्त व्हायरल होत होते. त्यामुळे अनेकांच्या मनात धडकी भरली होती. ऐन दिवाळीच्या वेळी जर दोन हजारांच्या नोटा बंद झाल्या तर दिवाळीचा बाजार कसा करायचा? असा प्रश्न अनेकांना पडत होता. मात्र, दिवाळी दरम्यान नोटबंदी झाली नाही. याबाबत आज संसदेत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकुर यांनी या विषयावर स्पष्टीकरण दिले.

आरबीआयने दिलेल्या अहवालात दोन हजार रुपयांच्या नोटांचे प्रमाण हे ३१.१८ टक्के इतके आहे. मात्र तरीही सध्या दोन हजाराच्या नोटा चलनातून कमी होताना दिसत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या मनामध्ये दोन हजाराच्या नोटबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, दिल्लीत संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनादरम्यान दोन हजाराच्या नोटबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला. यावेळी अनुराग ठाकुर यांनी उत्तर दिले. दोन हजाराच्या नोटा चलनातून बाद होणार नाहीत, असे ठाकुर यांनी स्पष्ट केले. त्यामुळे दोन हजाराच्या नोटबाबत मनात साशंकता बाळगण्याची सध्यातरी गरज नाही.

दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी देखील आरबीआयच्या अधिकाऱ्यांनी देखील याविषयावर स्पष्टीकरण दिले होते. दोन हजाराच्या नोटा बंद होण्याची बातमी चुकीची आहे. त्यामुळे अशा अफवांवर विश्वास ठेवू नका, असे एका अधिकाऱ्याने सांगितले होते.


हेही वाचा – भारतात पुन्हा नोटबंदी? दोन हजाराची नोट बंद होणार?

First Published on: December 4, 2019 3:41 PM
Exit mobile version