चीनमध्ये सापडली अडीच हजार वर्षांपूर्वीची अंडी

चीनमध्ये सापडली अडीच हजार वर्षांपूर्वीची अंडी

उत्खननात आढळलेली अंडी

चीनमधील पुरातत्व विभागाला उत्खननामध्ये एक बरणी आढळून आली आहे. या बरनीमध्ये शास्त्रज्ञांना अडी आढळून आली आहेत. ही अंडी अडीच हजार वर्षांपूर्वीची असल्याचा दावा शास्त्रज्ञांकडून केली जात आहे. शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार या बरनीत २० अंडी आढळून आली आहे. या अंड्यांचे कवच हिरवट आणि निळ्या रंगाचे असल्याचे सांगण्यात आले आहे. चीन देशाच्या पूर्वेकडील शेंझेन शहरात ही बरनी आढळून आली आहे. या अंड्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. या फोटोंना सोशल मीडियावर लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.

ड्रॅगनची अंडी?

चीनमध्ये या पूर्वीही पुरातत्व विभागाला अनेक वस्तू आढळत असतात. चीनमध्ये ड्रॅगन असल्याच्या कथा आहेत. या देशात अंडी सापडली असता ही डॅगनची अंडी असल्याची चर्चा लोकांमध्ये होती. या अंड्याचा आकार समान्य अंड्यांहून मोठा आहे त्यामुळे ही अंडी नेमकी कोणाची याबद्दल शास्त्रज्ञ शोध करत आहेत.

First Published on: March 29, 2019 12:05 PM
Exit mobile version