‘हिंदू आतंकवाद’ हे काँग्रेसचे षड्यंत्र – अरुण जेटली

‘हिंदू आतंकवाद’ हे काँग्रेसचे षड्यंत्र – अरुण जेटली

अरुण जेटली

‘हिंदू आतंकवाद’ हे काँग्रेस प्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीच्या काळात घडवून आणलेले षड्यंत्र असून खोटे पुरावे सादर करून काँग्रेस पार्टीने देशातील संपूर्ण हिंदू समाजच्या भावना दुखावल्याचा घणाघाती आरोप केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केला. एका पत्रकार परिषदेत बोलताना जेटली म्हणले की, राजकीय लाभ मिळवण्यासाठी समझौता एक्सप्रेस बॉम्ब हल्ल्या सारख्या घटनांमध्ये हिंदू समाजाला गोवण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्षाकडून झाला असून त्यासाठी ३-४ खोटे खटले सुद्धा बनवण्यात आले. मात्र, सरते शेवटी न्यायालयात एकही खटला टिकू शकला नाही. उल्लेखनीय म्हणजे काही दिवसांपूर्वीच न्यायालयाने ठोस पुराव्याअभावी समझौता बॉम्ब हल्ल्यांतील आरोपी स्वामी समीनानंद यांची मुक्तता केली होती.

काँग्रेसने माफी मागावी

काँग्रेसच्या ‘ हिंदू आतंकवाद ‘ अभियानाची कडक शब्दात टीका करीत जेटली पुढे म्हणले की, या कृत्यासाठी काँग्रेस पक्षाने संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागायला हवी अशी मागणी सुद्धा यावेळी केली. आपल्या पापाची उपरती झालेली असल्यामुळेच बहुतेक काँग्रेस चे नेते आजकाल मंदिरात हजेरी लावून आपण किती हिंदू आहोत हे दाखविण्यात मग्न आहे असा टोलाही यावेळी जेटली यांनी लगावला.

First Published on: March 29, 2019 3:37 PM
Exit mobile version