अरुण जेटली अनंतात विलीन

अरुण जेटली अनंतात विलीन

अरुण जेटली

भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री अरूण जेटली यांचे वयाच्या ६७ व्या वर्षी आज निधन झाले आहे. दिल्लीच्या एम्स रूग्णालयात त्यांनी शनिवारी १२.०७ मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला. ९ ऑगस्टपासून एम्सच्या टीमने त्यांना निरीक्षणासाठी ठेवले होते. पण त्यांची तब्येत सातत्याने खालावत गेल्याचे एम्सकडूनही जाहीर करण्यात आले. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि मुलगा हे आहेत. अरुण जेटली यांच्या जाण्याने देशाचे फार मोठे नुकसान झाले आहे.
A view of the sea
Pradnya Ghogale

जम्मू-काश्मीरमध्ये जाण्यासाठी अरुण जेटली यांनी प्रेरित केले होते: सत्यपाल मलिक, राज्यपाल जम्मू-काश्मीर

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी घेतले अंत्यदर्शन

अरुण जेटलींचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी भाजप मुख्यालयात

Pradnya Ghogale

भाजप मुख्यालयात बी.एल. संतोष, राज्यवर्धन राठोड, विजय गोयल, शिवराज चौहान, राम माधव आदींसह अनेक नेते दाखल.

Pradnya Ghogale

माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांचे पार्थिव थोड्याच वेळात भाजप मुख्यालयात पोहचणार

Pradnya Ghogale

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते मोतीलाल व्होरा, टीडीपीचे नेते चंद्राबाबू नायडू यांनी घेतले अरुण जेटली यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन

First Published on: August 24, 2019 3:41 PM
Exit mobile version