अरुणाचलच्या सियांगमध्ये लष्कराचे रुद्र हेलिकॉप्टर कोसळले, सर्च ऑपरेशन सुरू

अरुणाचलच्या सियांगमध्ये लष्कराचे रुद्र हेलिकॉप्टर कोसळले, सर्च ऑपरेशन सुरू

अरुणाचल प्रदेशामध्ये भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. सियांग जिल्ह्यातील सिंगिग गावात भारतीय सैन्यातील रुद्र हे हेलिकॉप्टर कोसळले आहे. हे दुर्घटनाग्रस्त ठिकाण तूटिंग हेडक्वार्टरपासून 25 किमी अंतरावर आहे. या घटनेची माहिती मिळताच बचाव कार्यासाठी पथक रवाना झाले आहे. अद्यार या अपघातात कोणी जखमी झाल्याबाबतची माहिती समोर आलेली नाही.

गुवाहाटी डिफेन्स पीआरओच्या म्हणण्यानुसार, तूटिंगपासून लष्कराचे हे हेलिकॉप्टर 25 किमी अंतरावर असलेल्या सिंगिंग गावाजवळ कोसळले आहे. ज्या ठिकाणी हा अपघात झाला ते ठिकाणं रस्ताने जोडलेला नाही. मात्र रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली आहे.

लष्कराचे हेलिकॉप्टर रुद्र हे हेलिकॉप्टर कोसळल्याचे झाल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या सर्च ऑपरेशन वेगाने सुरू आहे. रुद्र हे लष्कराचे लढाऊ हेलिकॉप्टर आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) ने भारतीय लष्करासाठी बनवले हे हेलिकॉप्टर ध्रुव हेलिकॉप्टरची आवृत्ती आहे. ज्यात हलक्या वजनाची वेपन सिस्टीम इंटिग्रेटेड (WSI) Mk-IV आहे.

यापूर्वी 5 ऑक्टोबर रोजी अरुणाचल प्रदेशातील तवांगजवळ लष्कराचे चिता हेलिकॉप्टर कोसळले होते. हेलिकॉप्टरमध्ये दोन पायलट होते, ज्यामध्ये एक पायलट लेफ्टनंट कर्नल सौरभ यादव शहीद झाला. त्याचवेळी दुसऱ्या पायलटला गंभीर अवस्थेत जवळच्या लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले.


मॅक्सिकोमध्ये ऑईल टँकरची धडक; ट्रेन पूर्णपणे जळून खाक

First Published on: October 21, 2022 1:13 PM
Exit mobile version