अण्णा हजारेंच्या पाऊलावर पाऊल; केजरीवालांचे १ मार्चपासून आमरण उपोषण

अण्णा हजारेंच्या पाऊलावर पाऊल; केजरीवालांचे १ मार्चपासून आमरण उपोषण

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल १ मार्चपासून आमरण उपोषणाला बसणार आहेत. दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा यासाठी केजरीवाल उपोषणाला बसणार आहेत. केजरीवाल राजकारणात येण्यापूर्वी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आश्रयाखाली सामाजिक कामे करायचे. अण्णा हजारेंनी बऱ्याचदा आमरण उपोषण केले आहे. त्यामुळे त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून अरविंद केजरीवाल देखील आमरण उपोषणाला बसणार आहेत.

नेमकं काय म्हणाले अरविंद केजरीवाल?

अरविंद केजरीवाल गेल्या कित्येक दिवसांपासून दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळण्याची मागणी करत आहे. त्यांची ही मागणी पूर्ण व्हावी, यासाठी ते आता १ मार्चपासून आमरण उपोषनाला बसणार आहेत. अरविंद केजरीवाल म्हणाले की, ‘दिल्ली पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा यासाठी एक आंदोलन करावं लागणार आहे. या आंदोलना सुरुवात १ मार्चापासून होणार आहे. या आंदोलनामध्ये अनिच्छित काळासाठी उपोषणाला बसणार आहेत.’ शनिवारी दिल्लीच्या विधानसभेमधून निघाल्यानंतर त्यांनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले की, ‘जनता मतदान करतात आणि सरकारला निवडूण आणतात. परंतु, सरकारजवळ तितके हक्क नाहीत, त्यामुळे आम्ही १ मार्चपासून आंदोलन सुरु करणार आहोत. मी दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा यासाठी आमरण उपोषण करेल.’

First Published on: February 23, 2019 7:55 PM
Exit mobile version