निगेटिव्ह टेस्टनंतरही मरकजच्या लोकांना डिस्चार्ज का नाही?; ओवैसींचा सवाल

निगेटिव्ह टेस्टनंतरही मरकजच्या लोकांना डिस्चार्ज का नाही?; ओवैसींचा सवाल

असदुद्दीन औवेसी

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (एआयएमआयएम) चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी मरकजमधील लोकांवरुन दिल्ली सरकारवर आरोप केला आहे. तबलीगी जमातीच्या लोकांना निगेटिव्ह चाचणी आल्यानंतरही जबरदस्तीने क्वारंटाईन केलं आहे. क्वारंटाईनचा कालावधी दोनदा पूर्ण केला आहे. तरी देखील त्यांना सोडलं जात नाही आहे. असं का? असा सवाल ओवैसींनी केला आहे.

ओवेसी यांनी एक ट्विट करत म्हटलं आहे की, “निजामुद्दीनमधील मरकजच्या लोकांची कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरही का डिस्चार्ज दिला जात नाही? त्यांनी आवश्यक क्वारंटाईन कालावधी दोनदा पूर्ण केला आहे, परंतु दिल्ली सरकार त्यांना सोडण्यास परवानगी देत ​​नाही. ते ३१ मार्चपासून तिथे आहेत आणि त्यांना त्वरित सोडण्यात यावं.”


हेही वाचा – मालदीव, युएईमध्ये अडकलेल्या नागरिकांना भारतात आणणार, नौदलाने पाठवली तीन जहाजं


देशात कोविड -१९ संक्रमित रुग्णांची संख्या ४६ हजारच्या वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी ही माहिती दिली. आकडेवारीनुसार, देशात कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत १,५७२ लोकांचा मृत्यू झाला आहे तर संसर्ग झालेल्यांची संख्या, ४६,५४१ वर पोहोचली आहे. तथापि, आतापर्यंत १२,९१९ रूग्ण बरे झाले आहेत.

 

First Published on: May 5, 2020 12:21 PM
Exit mobile version