शिवसेनेचा पराभव करु शकतो तर उत्तर प्रदेशमध्ये भाजपचाही करु शकतो, ओवैसींचा इशारा

शिवसेनेचा पराभव करु शकतो तर उत्तर प्रदेशमध्ये भाजपचाही करु शकतो, ओवैसींचा इशारा

महाराष्ट्रात जर शिवसेनेच्या खासदाराचा पराभव करु शकतो तर उत्तर प्रदेशमध्ये भाजपचाही करु शकतो असा थेट इशारा एआईएमआईएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी दिला आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या आहेत. भाजपसह इतर पक्षांकडूनही जोरदार तयारी सुरु आहे. एआईएमआईएम राष्ट्रीय अध्यक्ष असुद्दीन ओवैसी सभा आणि मेळावे घेत आहेत. यादरम्यान ओवैसी यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. यावेळी महाराष्ट्रातील खासदार इम्तियाज जलील यांचेही उदाहारण ओवैसी यांनी दिले आहे.

एआईएमआईएम राष्ट्रीय अध्यक्ष असुद्दीन ओवैसी यांनी म्हटलं आहे की, घाबरण्याची गरज नाही आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी काय म्हटलं आहे. तुम्ही ऐकले आहे. औरंगाबाद महाराष्ट्रात २२ ते २३ वर्षांपासून शिवसेनेचा खासदार होता. जेव्हा जलील माझ्याकडे आले या जागेवर लढण्यासाठी तेव्हा त्यांना म्हणालो परत विचार करा, जलील म्हणाले नाही मी विचार करुन आलो आहे की, मला लोकसभा निवडणूक लढायची आहे. जलील राजकीय घराण्यातून नाही आहेत. त्यांचे वडील औरंगाबादमधील प्रसिद्ध डॉक्टर होते. जलील २५ वर्षांचे पत्रकार होते. तेव्हा ते माझ्याजवळ आले आणि म्हणाले की, मला लोकसभेची निवडणूक लढायची आहे. तेव्हा त्यांना विचार करण्यास सांगितले परंतु त्यांनी सांगितले की, विचार करुनच आलो आहे. त्यांची जिद्द पाहून त्यांना निवडणूक लढवण्यासाठी सांगितले आणि २३ वर्षांपासून असणाऱ्या शिवसेना खासदाराला जलील यांनी पराभूत केलं, असा किस्सा ओवैसी यांनी सांगितला.

जलील जिंकले कारण त्यांच्यामध्ये लढाई करण्याचे धैर्य, सामर्थ्य होते. आपल्याला डॉ. अब्दुल मन्नान आपला भाऊ, मुलगा, गुलाम आहे. जेव्हा त्याला हाक मारु तेव्हा तो आपल्या समोर धावत येईल असा निर्णय आपल्याला केला पाहिजे. जर तुमचा आत्मविश्वास बुलंद ठेवाल तर आपण कोणतीही गोष्ट सहज मिळवू शकतो. माणसाने जर आपली ताकद आणि आत्मविश्वास दृढ ठेवला तर कोणतीही ताकद आपल्याला रोखू शकत नाही असे ओवैसी यांनी म्हटलं आहे.

First Published on: December 1, 2021 6:16 PM
Exit mobile version