Ashwani Kumar resigns: पंजाब काँग्रेसला मोठा धक्का, अश्विनी कुमार यांचा काँग्रेसला रामराम

Ashwani Kumar resigns: पंजाब काँग्रेसला मोठा धक्का, अश्विनी कुमार यांचा काँग्रेसला रामराम

देशात पाच राज्यांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरूवात झाली असून येत्या २० फेब्रुवारी रोजी पंजाबची निवडणूक होणार आहे. मात्र, पंजाब विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. माजी केंद्रीय कायदा मंत्री अश्विनी कुमार यांनी आज(मंगळवार) काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे पाठवला आहे. पक्षाबाहेर राहून देशासाठी चांगलं काम करू शकतो, असं देखील अश्विनी कुमार यांनी म्हटलंय.

यूपीए सरकारमध्ये महमोहन सिंग यांच्या नेतृत्त्वाखाली त्या कायदामंत्री म्हणून कार्यरत होत्या. गेल्या ४६ वर्षांपासून काँग्रेससोबत त्यांचे चांगले संबंध होते. कुमार यांच्या राजीनाम्यानंतर पक्षाला कोणत्याही प्रकारचा धोका किंवा फरक पडणार नाहीये, असं काँग्रेसने म्हटलंय.

मी या निष्कर्षावर पोहोचलो आहे की, सध्याच्या परिस्थितीत आणि माझ्या प्रतिष्ठेनुसार मी पक्षाच्या बाहेर राष्ट्रीय कार्य अधिक चांगल्या प्रकारे करू शकतो. ४६ वर्षांच्या मोठ्या काळानंतर मी पक्ष सोडत आहे आणि आमच्या स्वातंत्र्यसैनिकांनी कल्पना केलेल्या उदारमतवादी लोकशाहीच्या वचनावर आधारीत परिवर्तनवादी नेतृत्त्वाच्या विचाराने प्रेरित सार्वजनिक कारणाचा सक्रियपणे पाठपुरावा करण्यास उत्सुक आहे, असं अश्विनी कुमारने म्हटलंय.

दरम्यान, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जबाबदाऱ्यांबद्दल आभार मानले आणि त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


हेही वाचा : IPL 2022, Corona Positive: RCB ने बोली लावलेला सर्वात महागडा खेळाडू वनिंदू हसरंगा कोरोना पॉझिटिव्ह


 

First Published on: February 15, 2022 3:52 PM
Exit mobile version