आसाममध्ये पुराचा हाहाःकार! ८५ जणांनी गमावले प्राण

आसाममध्ये पुराचा हाहाःकार! ८५ जणांनी गमावले प्राण

आसाम राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. ब्रम्हपुत्रा नदीने आपली धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे संपूर्ण राज्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. पूरपरिस्थितीचा राज्यातील २८ जिल्ह्यातील ३३ लाख नागरिकांना या परिस्थितीचा फटका बसला असून आतापर्यंत ८५ जणांचा मृत्यू यामुळे झाला आहे. दरम्यान, पुरात अडकलेल्यांचे एनडीआरएफतर्फे बचावकार्य सुरु आहे. आसाममधील गुवाहटी, दिब्रुगढ, धुबरी, गोलपारा, जोरहाट, सोनीतपूर, धेमजी, लखीमपूर, बिस्वनाथ, उडलगुरी, बक्सा, नलबारी, बारपेटा, कामरुप, मोरीगाव, नागाव या महत्वाच्या जिल्ह्यांना पुराचा तडाखा बसला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे काही भागात भूस्खलनही आहे. यामुळे काही नागरिकांना त्यांचे प्राण गमवावे लागले.

दरम्यान, आसाममध्ये झालेल्या पुरामुळे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान उद्धवस्त झाले आहे. पार्कचा ९० टक्के भाग पाण्याखाली गेला आहे. तसेच ४७ प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. डझनभर जनावर बेपत्ता झाली आहेत. याशिवाय पार्कातून पळून गेलेले वाघ सभोवताच्या गावात दिसले आहेत. या पुरामुळे काझीरंग राष्ट्रीय उद्यान आणि पोबितोरा वन्यजीव अभयारण्याची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. एक शिंग असलेला गेंडा, हरण आणि हत्ती उंच भागात पळून गेले आहेत. तर काही प्राणी उंच उंच भागात जाऊन लपले आहेत.

हेही वाचा –

Corona: पीएमसी बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी राकेश वाधवान कोरोना पॉझिटिव्ह

First Published on: July 14, 2020 10:10 PM
Exit mobile version