शरीरसंबंध ठेवण्यासाठी त्याने दफन केलेला मुलीचा मृतदेह बाहेर काढला आणि…

शरीरसंबंध ठेवण्यासाठी त्याने दफन केलेला मुलीचा मृतदेह बाहेर काढला आणि…

अंत्यसंस्कार करण्याच्या काही क्षणांपूर्वी 'तो' जिवंत झाला

आसाममध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. माणुसकीला लाजवेल अशीच ही घटना आहे. एका माणसाने अल्पवयीन मुलीच्या मृतदेहासोबत शरीरसंबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. या ५० वर्षीय विकृताला पोलिसांनी अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी या मुलीचा रहस्यमयी मृत्यू झाला होता. त्यानंतर कुटुंबीयांनी नदीकाठी मृतदेहाचे दफन केले होते.

आसामच्या धेमाजी जिल्ह्यात हा किळसवाणा प्रकार घडला. १७ ला रात्री या मुलीचे निधन झाले. मुलीच्या निधनानंतर तिच्या कुटुंबीयांनी धेमगावात नदीकाठी मृतदेहाचे दफन केले. १८ मे रोजी दुपारी विकृताने नदीकाठी दफन केलेला मृतदेह बाहेर काढला व तो शरीरसंबंध ठेवण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी तिथे असलेल्या स्थानिक मच्छीमारांनी त्याला पाहिले. त्यांनी या विकृताला पकडले व पोलिसांच्या हवाली केले.

पोलिसांनी पकडल्यावर या माणासाने शरीरसंबंध ठेवण्यासाठी मृतदेह बाहेर काढल्याचे कबूल केलं. आसाम पोलिसांनी आरोपीविरोधात कलम ३०६, ३७७ आणि पॉस्को कायद्याच्या कलम आठ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. अलीकडेच या आरोपीची अलीकडेच तुरुंगातून सुटका झाली होती. कोरोना व्हायरसमुळे आरोपी तुरुंगातून सुटला होता. आरोपी मनोरुग्ण नाहीय. २०१८ साली पत्नीने नोंदवलेल्या एफआयआर वरुन त्याला अटक करण्यात आली होती. पत्नीने तक्रार नोंदवल्यानंतर तो फरार होता. पोलिसांनी सप्टेंबर २०१९ मध्ये त्याला अटक केली होती अशी माहिती डीएसपी प्रदीप कोनवार यांनी दिली.


हे ही वाचा – ‘पाताल लोक’ ची निर्माती अनुष्का शर्माला कायदेशीर नोटीस!


 

First Published on: May 22, 2020 11:48 AM
Exit mobile version