अंतराळातून १६८ दिवसांनी परतले तीन अंतराळवीर

अंतराळातून १६८ दिवसांनी परतले तीन अंतराळवीर

सोयूझ कुपी -००७ यान लँड होतांना

नासाच्या एका स्पेसक्राफ्टला पृथ्वीवर उतरवण्यास तीन अंतराळवीरांना यश आले आहे. कझाकस्तान येथील एका दुर्गम भागात सोयूझ कुपी -००७ यानाला सुरक्षित उतरवण्यात आले. या मिशनमध्ये यु.एस.चे अंतराळवीर स्कॉट टिंगल, जपानचे नोरशिगे कनानई आणि रशियाचे एंटन श्कप्लेरोव यांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. त्यांच्या या कमगिरीसाठी नासाने त्यांचे अभिनंदन केले आहे. परतलेल्या आंतराळवीरांनी मागील पाच महिन्यांहून अधिक कालावधी अंतराळात काढला. पृथ्वीवर येण्याअगोदर हे यान काही काळासाठी नासाच्या संपर्क कक्षेच्या बाहेर गेल्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र अखेर यान सुखरुप परतल्याने नासाने सुटकेचा निश्वास सोडला आहे.

सुरक्षीत परतलेले अंतराळवीर

स्पेस स्टेशनवरुन केला परतीचा प्रवास

रशिया आणि जपानचे अंतराळवीर या प्रकल्पात सहभागी होते. मागील १६८ दिवस हे तीघेही पृथ्वीबाहेर असलेल्या स्पेसस्टेशनवर कार्यरत होते. पृथ्वी आणि इतर ग्रहांचे निरिक्षण या स्पेसस्टेशनद्वारे करण्यात येते. या स्पेशस्टेशनमध्ये एकूण ५५ शास्त्रज्ञ कार्यरत आहेत. हे स्पेसस्टेशन नासाच्या अखत्यारित कार्यरत आहे.
या तीनही अंतराळवीरांनी सोयूझ यानाद्वारे पृथ्वीवर येण्याचा संदेश नासाला पाठवला होता. पाठवलेल्या संदेशानुसार त्यांनी पृथ्वीवर येण्याची तयारी केली. सोयूझ यानातून अंतराळवीरांनी ताशी ५०० मैल वेगाने प्रवास केला. कझाकस्थानच्या स्थानिक वेळेनुसार सकाळी ८ वा ३९ मि. त्यांना यान पृथ्वीवर उतरवण्यास यश मिळाले.

पृथ्वीच्या कक्षेत येताच यानाने घेतला पेट

अंतराळातून पृथ्वीच्या कक्षेत येत असताना गुरुत्वाकर्षण लहरींमुळे यान वेगाने पृथ्वीच्या कक्षेत शिरले. त्यामुळे इंजिन गरम होऊन त्याने पेट घेतला. या घटनेमुळे काही तासांसाठी या यानाचा संपर्कही तुटला होता. या अंतराळवीरांनी प्रसंगावधान राखत ही आग विझवली व यानावर नियंत्रण मिळवले. पृथ्वीवर आल्यानंतर जमिनीपासून तब्बल १२ हजार फुटांवर पॅराशुट उघडण्यात आले. यान येत असतांनाच हेलिकॉप्टरच्या सहाय्याने याचे चित्रीकरण केले गेले. सुरक्षित लँडिंगनंतर नासा मुख्यालयाच्या शास्त्रज्ञांनी टाळ्या वाजवून आपला आनंद व्यक्त केला.

First Published on: June 4, 2018 12:56 PM
Exit mobile version