दिल्ली विधानसभा: व्हायरल झाला ‘बेबी केजरीवाल’

दिल्ली विधानसभा: व्हायरल झाला ‘बेबी केजरीवाल’

दिल्ली विधानसभा: व्हायरल 'बेबी केजरीवाल'

आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे मफलर सर्वसामान्यांमध्येही लोकप्रिय आहे. इतकेच नाही तर हिवाळ्यामध्ये केजरीवाल यांना मफलरमध्ये पाहिल्यामुळे लोकांनी त्यांना ‘मफलरमॅन’ असं नावं ठेवलं. केजरीवाल यांच्या या मफलरवर अनेक मीम्स आणि जोक्स देखील व्हायरल झाले होते. आता यानंतर त्यांच्यासारखा हुबेहूब दिसणार चिमुरडा सध्या सोशल मीडियावर फारच चर्चेत आला आहे. आज सकाळी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालासाठी मतमोजणी सुरू होताच आम आदमी पार्टीने आपल्या ट्विटर अकाऊंटवर अरविंद केजरीवाल यांच्यासारखा हुबेहूब दिसणारा चिमुरड्याचा फोटो शेअर केला.

या फोटोत दिसणाऱ्या चिमुरड्याने अरविंद केजरीवाल यांच्यासारखे कपडे परिधान केले आहेत. तसंच त्याने गळ्यात मफलर घातले असून त्याने केजरीवाल यांच्यासारख्या मिशा काढल्या आहेत. याशिवाय त्याने मरुन रंगाचा स्वेटर घातला आहे. हा फोटो शेअर करताना आम आदमी पार्टीने ‘मफलरमॅन’ असं लिहून पोस्ट केलं आहे. दिल्लीमध्ये पुन्हा एकदा केजरीवाल यांचेच सरकार आलं असून केजरीवाल यांनी हॅट्ट्रिक केली आहे.

या चिमुरड्याचे वडिल व्यापारी असून ते आपचे समर्थक आहे. ते दिल्लीतील निकाला दरम्यान मैं आम आदमी हूँ असं लिहिल्या टोप्याचे वाटप करीत होते. आतापर्यंत आपने ट्विट केलेल्या या चिमुरड्याच्या फोटोला २२ हजारपेक्षा जास्त लाईक्स मिळाले असून तीन हजारपेक्षा अधिक रिट्विट केलं आहे.

८ फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभेच्या ७० जागांवर मतदान करण्यात आलं होत. या निवडणूकीच्या रिंगणात ६७२ उमेदवार होते. आतापर्यंत आम आदमी पार्टी ६२ जागांवर आघाडीवर आहे तर भाजप आठ जागांवर आघाडीवर आहे.


हेही वाचा – Video: जले पे नमक; मनोज तिवारींच्याच गाण्यावर आपचा जल्लोष


 

First Published on: February 11, 2020 7:30 PM
Exit mobile version