ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी मोदींसोबत काढला सेल्फी

ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी मोदींसोबत काढला सेल्फी

जपानमध्ये सध्या जी २० देशाची शिखर परिषद सुरु असून आज या शिखर परिषदेचा शेवटचा दिवस आहे. या दरम्यान ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीदरम्यान ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी नरेंद्र मोदींचे कौतुक करत त्यांच्यासोबत सेल्फी देखील क्लिक केला. भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता किंवा मोदींचे चाहते किती आहेत हे विशेष सांगयला नको. याशिवाय जगातील इतर देशांमधील नेत्यांना देखील मोदींच्या लोकप्रियतेचे कौतुक वाटते.

हे ही वाचा: दहशतवाद्यांविरोधात सगळ्यांनी एकत्र लढू – पंतप्रधान मोदी

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी केलेल्या एका ट्विटमुळे सध्या भारतात एकदम त्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. नुकतीच ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी आपल्या ट्विटर अकाऊंट वरून एक पोस्ट शेअर करत ‘कितना अच्छा है मोदी!’ असे पोस्टमध्ये लिहिले आहे. या फोटोमध्ये स्कॉट मॉरिसन आणि नरेंद्र मोदी हे दोघेही सेल्फीसाठी कॅमेऱ्याकडे बघून स्माईल करताना दिसत आहे.

यामुळे मोदींच्या नावाची चर्चा देखील होत आहे. दरम्यान आज जी २० परिषदेत पर्यावरणासारख्या गंभीर मुद्द्यावर जगातील नेत्यांची चर्चा होणार आहे. या बैठकीत पुढील २०५० पर्यंत जगातील समुद्रात असणारा प्लास्टिक कचरा संपुष्टात आणण्यासाठी एकमत होणार असल्याची शक्यता आहे.

ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांच्या या सेल्फीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा आपल्या प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी मॉरिसन यांना आपला मित्र असे संबोधले असून ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या द्विपक्षीय संबंधांवर अतिशय खुश आहे, असे म्हटले आहे. विशेष म्हणजे, मोरिसन यांच्या हिंदी ट्विटला उत्तर दिले आहे.

First Published on: June 29, 2019 12:01 PM
Exit mobile version