स्वतःचेच मूत्र पिऊन ‘ती’ सहा दिवस जिवंत राहिली

स्वतःचेच मूत्र पिऊन ‘ती’ सहा दिवस जिवंत राहिली

ब्रुक फिलिप्स

स्वतःची लघवी पिण्याचा विचारही फारसं कोणी करू शकत नाही. मात्र तसा प्रसंगच ओढावला किंवा अगदी जिवाची बाजी लागली असेल तरच हे पाऊल कोणी उचलेलं. अनेकदा एका ओसाड ठिकाणी कोणी फसले असेल तर जिवंत राहण्यासाठी ते कोणत्या थराला जातात हे आपण फक्त चित्रपटातच बघितले आहे. मात्र ऑस्ट्रेलियामध्ये याच एक जिवंत उदाहरण समोर आले आहे. गाडी बंद पडल्यामुळे एका ओसाड वाळवंटात अडकलेल्या महिलेने जिवंत राहण्यासाठी स्वतःचीच लघवी पिली असल्याचा प्रकार समोर आला आहे. ही महिला तब्बल सहा दिवस या ठिकाणी अडकून होती. या दिवसांमध्ये या महिलेजवळ पाणी नसल्यामुळे तिने सहा दिवस स्वतःचीच लघवी पिली. ब्रुक फिलिप्स (४०) असे या महिलेचे नाव आहे. आपल्या घरातून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी या महिलेनी प्रवास सुरुवात केला होता. मात्र प्रवासादरम्यान वाळवंटात तिची गाडी अडकली होती. या महिलेसोबत फक्त तिचा कुत्रा आणि मांजर होते. सहा दिवसानंतर या महिलेला मदत मिळाली आणि या महिलेला वाचवण्यात आले.

काय म्हणाल्या ब्रुक 

ब्रुक फिलिप्स यांनी सहा दिवसांपूर्वी आपल्या घरातून प्रवास सुरु केला होता. त्यांच्या जवळ थोडेसे खाद्य पदार्थ होते आणि अर्धा लिटर पाणी होते. ओसाड जागी गाडी अडकल्यामुळे त्यांनी मदतीची वाट बघितली. मात्र त्यांना मदत मिळाली नाही. त्यांच्या जवळ असलेले अर्धा लिटर पाणी त्यांनी एका दिवसातच संपवले. वाळवंटात गरमी असल्यामुळे त्यांना सतत तहान लागत होती. अखेर नाईलाजाने त्यांनी स्वतःचीच लघवी पिली.

“मी खोट बोलत नाही. मी स्वतःचेच मूत्र पिले. मागील काही दिवसांपासून मी स्वतःचीच लघवी पिली आहे. मी मानसिक रित्या खूप खचले होते. माझ्याजवळ काही बिस्किटे होती. मात्र गळा सुखल्यामुळे ते घशाखाली जात नव्हते. अखेर पर्याय म्हणून मी लघवी पिली. मला वाटले माझा मृत्यू येथेच होणार. सहा दिवसांनी मला काही लोक दिसले तेव्हा माझ्या जीवात जीव आला.” – ब्रुक फिलिप्स

First Published on: November 22, 2018 10:20 AM
Exit mobile version