Ayodhya Ram Mandir: प्रभू रामाचंच नाव घेता, माता सीतेचं का नाही; वाचा कोणी उपस्थित केला हा सवाल

Ayodhya Ram Mandir: प्रभू रामाचंच नाव घेता, माता सीतेचं का नाही; वाचा कोणी उपस्थित केला हा सवाल

अयोध्या: अयोध्येत प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची मंगळवारी, 22 जानेवारीला विधीवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी चार किलोमीटर लांबीची ‘सद्भाव रॅली’ काढली. यावेळी त्यांनी रॅलीला संबोधितही केले. मुख्यमंत्री ममत बॅनर्जी यांनी नाव न घेता भाजपवर निशाणा साधला आणि म्हणाल्या की, तुम्ही रामाचे नाव घेता, पण सीतेचे नाव का घेत नाही? यासोबतच त्यांनी विचारले की तुम्ही महिला विरोधी आहात का? रामचंद्रांनी रावणाला मारण्यासाठी दुर्गेची पूजा केली होती, असंही मुख्यमंत्री म्हणाल्या. (Ayodhya Ram Mandir Taking the name of Lord Rama not Sita Are you anti feminist Mamata Banerjee s question to BJP )

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो. जीवनाची लढाई सुरू झाली आहे. जर तुम्हाला जगायचे असेल, तर कशाचीही भीती बाळगू नका. कठीण काळ येईल, शत्रू येतील. लढाई जरा कठीण आहे पण तुम्ही आम्ही लढू आणि जिंकू.” रॅलीला संबोधित करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, आम्ही एकजूट राहू आणि आम्हाला दंगली नको आहेत. आम्हाला शांतता हवी आहे.

ममता बॅनर्जींची प्राणप्रतिष्ठेनिमित्त ‘सद्भाव रॅली’

ममता बॅनर्जी म्हणाल्या, “तुम्ही लोक कधीच सीतेबद्दल बोलत नाही. सीतेशिवाय राम अपूर्ण आहे. तुम्ही फक्त रामाबद्दलच बोलता, सीतेबद्दल नाही. तुम्ही स्त्रीविरोधी आहात का?” मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी हाजरा ते पार्क सर्कस अशी ‘सद्भाव रॅली’ काढली. यावेळी सर्व धर्माचे लोक रॅलीत सहभागी झाले होते. रॅलीत हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन या सर्व धर्माच्या लोकांनी सहभाग घेऊन ममता बॅनर्जींनी मोर्चा काढला.

‘तुम्ही मिसोगॅनिस्ट आहात का?’ ममता बॅनर्जी यांचा सवाल

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आपल्या भाषणात म्हणाल्या, “मी रामाच्या विरोधात नाही. मी राम आणि सीता दोघांचाही आदर करते पण तुम्ही सीतेचे नाव का घेत नाही? तुम्ही स्त्रीविरोधी आहात का? राम जन्माला आला नव्हता का? कौशल्या नव्हती का? कौशल्या मातेने रामाला जन्म दिला. सीता 14 वर्षे रामासोबत वनवासात गेली आणि अग्निपरीक्षाही दिली. रामाने रावणाचा वध करण्यासाठी दुर्गेची पूजा केली होती, असं बॅनर्जी म्हणाल्या.

ममता बॅनर्जींच्या आरोपांना भाजपचे प्रत्युत्तर

अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेक कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले असताना ममता बॅनर्जींचे हे वक्तव्य आले आहे. ममता बॅनर्जी यांच्या विधानावर राज्य भाजपने प्रत्युत्तर दिले आणि म्हटले, “जेव्हा घटस्फोट विधेयक आणले गेले तेव्हा टीएमसीने त्याला विरोध केला होता. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांच्या बाबतीत पश्चिम बंगाल राज्यांच्या यादीत अव्वल आहे. अल्पसंख्याक समाजाच्या मिरवणुकीला परवानगी देतात पण देवी दुर्गेच्या मिरवणुकीला परवानगी दिली जात नाही, त्यामुळे त्यांना भाजपला महिला विरोधी म्हणण्याचा नैतिक अधिकार नाही.

(हेही वाचा Uddhav Thackeray : श्यामाप्रसाद मुखर्जी राजकारणातला तुमचा बाप, त्यांच्याबद्दल बोला; ठाकरेंचे भाजपाला आव्हान )

First Published on: January 23, 2024 5:25 PM
Exit mobile version