आता ब्लॅक फंगसवरही पंतजलीचे औषध बाजारात येणार, रामदेव बाबांचा नवा दावा

आता ब्लॅक फंगसवरही पंतजलीचे औषध बाजारात येणार, रामदेव बाबांचा नवा दावा

Patanjali Research Trust : बाबा रामदेवांच्या पतंजली फाउंडेशनला दान दिल्यास मिळेल टॅक्समध्ये सूट

देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरु असतानाचा पंतजलि संस्थ्येचे संस्थापक बाबा रामदेव अॅलोपॅथीक औषधांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. अशातच बाबा रामदेव यांचे निकटवर्तीय आचार्य बाळकृष्ण यांनी आता ब्लॅक फंगसवरही पंतजलि कंपनी आयुर्वेदिक औषध बाजारात आणणार असल्याचा दावा केला आहे. देशात सध्या कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांमध्ये ब्लॅक फंगस आजाराची गंभीर लक्षणे आढळत आहेत. यात बाळकृष्ण यांनी दावा करत सांगितले की, पतंजली आयुर्वेदिक कंपनी आणि पतंजलि योगापीठातील या औषधांसंदर्भातील काम आणि अत्यावश्यक औपचारिकता पूर्ण केल्या आहेत.

या औषधावरील काम अंतिम टप्प्यात

ब्लॅक, व्हाइट आणि येलो या तिन्ही फंगस इंफेक्शनवर तयार केलेल्या या औषधाचे काम शेवटच्या टप्प्यात आले असून यावर बोलताना बाबा रामदेव म्हणाले, की, सध्या सुरु असलेल्या वादविवादांमध्येही पतंजलि संस्था लोकांच्या सेवेसाठी काम सुरुच ठेवणार असून मागे हटणार नाही.

देशात सध्या कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांमध्ये ब्लॅक फंगस इंफेक्शनसह इतर अनेक फंगल इंफेक्शन प्रकरणे वाढत असून ती रुग्णांसाठी अधिक धोकादायक ठरत आहे. यावर बोलताना रामदेव बाबा म्हणाले की, गंभीर फंगस इंफेक्शनविरोधात लढण्यासाठी पतंजलि रिसर्च सेंटरने औषध निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. या औषधाची निर्मिती बालकृष्ण यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन केंद्र प्रमुख डॉ. अनुराग वार्ष्णे यांच्या नेतृत्वात एक संशोधन पथक करणार आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची मंजूरी अद्याप बाकी 

फंगस इंफेक्शनविरोधात लढण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या औषधासाठी रिसर्च करण्याऱ्या टीमचे बाबा रामदेवांनी भरभरुन कौतुक केले आहे. यावेळी बाबा रामदेव यांनी असा दावा केला की, औषधाच्या निर्मितीसाठी रिसर्च करणाऱ्या पथकाने ५ ते ६ आठवड्यात औषध बनवण्याचे काम पूर्ण केले. यावर बालकृष्ण यांनीही सांगितले की, या फंगस इंफेक्शनवरील औषध निर्मितीवरील संशोधन पूर्ण झाले असून आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून औपचारिकरित्या मंजूरी मिळणे बाकी आहे. परंतु या मंजुरीसाठी अजून एक ते दीड आठवड्याचा कालावधी लागू शकतो असेही त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वीही बाबा रामदेव यांनी कोरोनावर कोरोनिल हे औषध लाँच करत वाद ओढावून घेतला होता.


 

First Published on: June 2, 2021 4:11 PM
Exit mobile version