बाबा रामदेव यांच्या पतंजलीने दूधासह ५ नवे प्रोडक्ट्स केले लॉन्च

बाबा रामदेव यांच्या पतंजलीने दूधासह ५ नवे प्रोडक्ट्स केले लॉन्च

योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजलीने आणखी ५ नविन प्रोडक्ट्स लॉन्च केले आहेत. औषध आणि रिटेल प्रोडक्ट्सनंतर आता पतंजलीने डेअरी प्रोडक्ट्स विकण्याचा निर्णय घेतला आहे. बाजारामध्ये यापुढे पंतजली दूध, दही, ताक, पनीर आणि जनावरांसाठी खाद्यपदार्थ मिळणार आहेत. बाबा रामदेव यांनी आज दिल्लीच्या तालकटोरा स्टेडिअमवर पंतजलीचे हे नवे प्रोडक्ट्स लॉन्च केले. पंतजलीचे हे नविन खाद्यपदार्थ पहिल्या टप्प्यामध्ये दिल्ली, राजस्थान, हरियाणा आणि महाराष्ट्रामध्ये उपलब्ध केले जाणार आहे.

पतंजलीचे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ बाजारात

पतंजलीचे दूध १०० टक्के स्वत असेल. त्याचसोबत पंतजलीचे दही, ताक आणि पनीर हे पदार्थ देखील स्वत असणार आहेत. पतंजली दूध आणि दुग्धजन्य पदार्थ बनवण्याच्या क्षेत्रामध्ये नवीन विक्रम करेल. त्याचसोबत येत्या दिवाळीमध्ये पतंजलीचे कपडे बाजारात खरेदी करता येणार असल्याचे रामदेव बाबा यांनी या कार्यक्रमा दरम्यान सांगितले. तसंच पतंजलीचे दूध शुध्द देशी गाईचे असणार आहे. याची किंमत देखील स्वत असेल ४० रुपयाला एक लीटर दूध मिळणार आहे.

पतंजलीचे पाणी सुध्दा उपलब्ध होणार

पंतजलीच हे दूध शेतकऱ्यांकडून घेतले जाणार असून त्यांच्या अकाऊंटमध्ये थेट पैसे ट्रान्सफर केले जाणार असल्याचे रामदेव बाबांनी सांगितले. पंतजलीचे हे दूध इतर दुधाच्या तुलनेत २ रुपयांनी स्वस्त असणार आहे. बाबा रामदेव यांनी त्यांचे सहकारी आचार्य बाळकृष्ण यांनी मिळून पतंजलिचा ब्रँड सुरू केला होता. या ब्रँडअंतर्गत या दोघांनी चारा, पंतजली दुधासोबतच पतंजली फ्रोजन भाज्या, पंतजली सोलार पॅनेल, पतंजली सोलार लाईट, पंतजलीचे फिल्टर केलेलं शुद्ध पाणी विकण्याचं ठरवलं आहे.

दिवाळीमध्ये पंतजलीचे कपडे मिळणार

दरम्यान रामदेव बाबा यांनी सांगितले की, येत्या दिवाळीमध्ये पंतजलीचे कपडे देखील लॉन्च केले जाणार आहेत. त्याची ३००० पेक्षा जास्त उत्पादने असणार आहे. ज्यामध्ये लहान मुलांपासून ते महिला आणि पुरुषांसाठी सर्व कपडे उपब्ध असणार आहे. पतंजली जिन्स, लग्नाच्या कपडे देखील मिळणार आहे. कपडयाच्या क्षेत्रामध्ये आम्ही विदेशी कंपन्यांना टक्कर देणार असल्याचे रामदेव बाबा यांनी सांगितले.

First Published on: September 13, 2018 4:38 PM
Exit mobile version