अडवाणी, जोशींसह ४९ जणांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश

अडवाणी, जोशींसह ४९ जणांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश

बाबरी मशिद पाडल्याप्रकरणी सीबीआयचे विशेष न्यायालय येत्या 30 सप्टेंबरला निकाल देणार आहे. सीबीआय विशेष न्यायालयातील अयोध्या प्रकरणाचे न्यायमूर्ती सुरेंद्र यादव यांच्यामार्फत हा निकाल जाहीर केला जाणार आहे. 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशिद पाडण्यात आली होती. त्याबाबत तब्बल 27 वर्षांनी कोर्टाचा निर्णय येणार आहे.

सीबीआयच्या आरोपपत्रात 49 जणांची नावे आहेत. यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह, मुरली मनोहर जोशी, साध्वी ऋतंभरा, माजी केंद्रीय मंत्री उमा भारती आणि विनय कटियार यांचा समावेश आहे. या सर्वांना ३१ सप्टेंबर रोजी कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 49 आरोपींपैकी 17 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 32 आरोपींचा फैसला येत्या 30 सप्टेंबरला होणार आहे.

सीबीआयने आरोपींविरोधात 351 पुरावे आणि 600 दस्तऐवज सादर केले आहेत. यापूर्वी सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाची सुनावणी 31 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार विशेष न्यायालय 31 ऑगस्टपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचे प्रयत्न केले. मात्र, ही प्रक्रिया पूर्ण होऊ न शकल्याने ती महिनाभर पुढे ढकलण्याची वेळ आली.

First Published on: September 17, 2020 7:07 AM
Exit mobile version