ताज महालमध्ये आरती; चौकशी सुरू

ताज महालमध्ये आरती; चौकशी सुरू

संग्रहित छायाचित्र

आग्रातील ताजमहालवरून सध्या वाद सुरू आहेत. हिंदुत्ववादी संघटनांकडून ताजमहालच्या ठिकाणी शिव मंदिर होते असा दावा केला जात आहे. दरम्यान, यामध्ये आता एका नवीन वादाची भर पडली आहे. ताजमहाज जवळच्या मस्जिदीमध्ये आरती केल्याची व्हिडीओ व्हायरल झाला आहे. शनिवारी व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये आरती करणारी महिला बजरंग दलाची तालुका अध्यक्षा असून त्यांच्यासोबत दोन महिला कार्यकर्त्या असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दरम्यान, पुरातत्व विभाग आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलानं याबाबत चौकशी सुरू असल्याची माहिती दिली आहे. मीना दिवाकर असं या बजरंग दलाच्या जिल्हा अध्यक्षांचं नाव आहे. ताजमहालच्या परिसरामध्ये एक मस्जिद आहे. या मस्जिदमध्ये आम्ही धूप, माजीस आणि अगरबत्ती घेऊन प्रवेश केल्याची माहिती खुद्द मीना दिवाकर यांनी दिली आहे. ताजमहालाच्या ठिकाणी पूर्वी शिव मंदिर होते. पण, मस्जिदीमुळे त्याचं पावित्र्यता भंग झाली. त्यामुळे आम्ही आरती केली असं उत्तर मीना दिवाकर यांनी दिलं.

ताज महालच्या परिसरामध्ये नमाज अदा करण्यास परवानगी आहे. मग आता आरती करण्यासाठी देखील परवानगी द्यावी अशी मागणी मीना दिवाकर यांनी केली आहे. आरती केल्यानं नियमांचा भंग झाला असल्यास आम्ही त्याबद्दल कोणत्याही प्रकारची शिक्षा भोगण्यास तयार असल्याचं मीना दिवाकर यांनी म्हटलं आहे. ताज महाल परिसरामध्ये माचिस आणि इतर काही वस्तुंवर बंदी घातल्याची माहिती पुरातत्व विभाग आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलानं दिली आहे. काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्षांनी मात्र घडलेल्या प्रकाराबद्दल निषेध केला आहे. दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा मीना दिवाकर यांचा उद्देश असून त्याविरोधात सक्त कारवाई करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष हाजी जमुलुदिन कुरेशी यांनी केली आहे. व्हिडीओच्या आधारे चौकशी केल्यानंतर कारवाई केली जाईल अशी माहिती पुरातत्व विभाग आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलानं दिली आहे.

First Published on: November 18, 2018 11:55 AM
Exit mobile version