बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसनवर २ वर्षांची बंदी; आयसीसीची कारवाई

बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसनवर २ वर्षांची बंदी; आयसीसीची कारवाई

शाकिब अल हसन

बांगलादेशचा अष्टपैलू फलंदाज आणि टी-२० चा कर्णधार शाकिब अल हसनवर मॅच फिक्सिंगसाठी बुकीशी संपर्क केल्याप्रकरणी दोन वर्षाची बंदी घालण्यात आली आहे. मात्र त्याची माहिती आयसीसीला दिली नसल्याच्या आरोपावरून इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल (आयसीसी)ने त्याच्यावर ही कारवाई केली आहे. दरम्यान, शाकिबने आपल्यावरील आरोप मान्य केल्यामुळे त्याच्यावरील बंदीचा कालावधी एक वर्षाने कमी करण्यात आला आहे. येत्या ३ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या भारत-बांगलादेश मालिकेत मात्र शाकिब खेळू शकणार नाही.

सध्या शाकिब बांगलादेशचा एकदिवसीय आणि टी २० कर्णधार आहे. त्याचशिवाय एकदिवसीय जागतिक क्रमवारीत तो अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थानी आहे. मात्र भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे शाकिब अल हसन याच्यावर ICC ने बंदीची कारवाई केली आहे. शाकिबने ICC च्या लाचलुचपत प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्याचे मान्य केले. त्यानंतर ICC ने हा निर्णय घेतला. त्यामुळे त्याला पुढील हंगमातील IPL आणि टी-20 World Cup ला देखील मुकावे लागणार आहे.

First Published on: October 29, 2019 8:17 PM
Exit mobile version