Bank Close on Chhath puja: या आठवड्यात ५ दिवस बँका बंद, पहा संपूर्ण वेळापत्रक

Bank Close on Chhath puja: या आठवड्यात ५ दिवस बँका बंद, पहा संपूर्ण वेळापत्रक

देशात छटपूजेला सुरुवात झाली आहे. देशात छटपूजेचा मोठा उत्साह सुरू आहे. नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात छटपूजा आल्याने या दिवासत बँकासंदर्भातील कामे लवकरात लवकर करुन घ्या कारण या आठ आठवड्यात तब्बल ५ दिवस बँका बंद राहणार आहेत. छट पूजाच्या निमित्ताने अनेक प्रायव्हेट आणि सरकारी बँका बंद राहणार आहे. जाणून घ्या या आठवड्यातील बँकांच्या सुट्ट्यांचे संपूर्ण वेळापत्रक.

छटपूजेसाठी बिहार, झारखंडमधील बँका बंद ५ दिवस बंद राहणार आहे. त्याचप्रमाणे पटणा आणि रांचीमध्ये १० नोव्हेंबर रोजी बँका बंद राहणार आहेत. तर ११ नोव्हेंबर रोजी छट पूजेनिमित्त पटणामधील सर्व बँकेच्या कर्मचाऱ्यांना सुट्टी असेल. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि दिल्ली सरकारने १० नोव्हेंबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. बिहार, झारखंड राज्यात छट पूजाचा मोठा उत्साह असतो. त्यामुळे इथल्या बँकांना सुट्ट्या देण्यात येतात. तुलनेत इतर राज्यात छट पूजाचा इतका उत्साह पहायला मिळत नाही.

सुट्ट्यांचे वेळापत्रक

नोव्हेंबर महिन्याचा विचार केला असता नोव्हेंबर महिन्यात बँकांना तब्बल १७ दिवस सुट्ट्या असणार आहेत. देशातील विविध बँकांमधील कामकाज १७ दिवस बंद राहणार आहे. या सुट्ट्यांमध्ये नोव्हेंबर महिन्यात येणारे महत्त्वाचे सण आणि महत्त्वाच्या व्यक्तींच्या जयंतींचा समावेश आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात बँकांची कामे लवकरात लवकर उरकून घ्या.


हेही वाचा – Bank Holidays In November: नोव्हेंबर महिन्यात बँकाना १७ दिवस सुट्टी, पहा पूर्ण यादी

First Published on: November 9, 2021 5:32 PM
Exit mobile version