Bank Holidays : मकर संक्रांतीला बँकेला सुट्टी आहे का? जानेवारीत ‘इतके’ दिवस बँका राहणार बंद

Bank Holidays : मकर संक्रांतीला बँकेला सुट्टी आहे का? जानेवारीत ‘इतके’ दिवस बँका राहणार बंद

मुंबई :  महत्त्वाच्या कामासाठी बँकेत जाण्याचा विचार करत असला तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही बँकेशी संबधित कोणतेही महत्त्वाचे काम करणार असाल, तर बँका कोणत्या दिवशी बंद असतील याची माहिती असली पाहिजे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India)जानेवारी 2024 च्या बँक सुट्ट्यांसाठी जारी केलेल्या यादीनुसार, प्रजासक्ता दिन आणि इतर सणांमुळे जानेवारी महिन्यात 16 दिवस बँका बंद रहाणार आहेत.

बँक सुट्ट्या दोन प्रकारच्या असतात. काही सुट्ट्या संपूर्ण देशात असतात. तर काही सुट्ट्या फक्त राज्यात असतात. राष्ट्रीय सुट्ट्यांदिवशी देशभरातील सर्व बँका बंद राहतात. राज्य सुट्ट्यांदिवशी तुम्ही कोणत्या राज्यात राहता त्यानुसार त्या तारखेला सुट्ट्या असतात. मात्र आज (ता.15 जानेवारी) देशातील अनेक राज्यांमध्ये मकर संक्रांत साजरी केली जात आहे. रविवार  आणि मकर संक्रांतमुळे देशभरात बँका बंद होत्या. 15 जानेवारी रोजी पोंगलमुळे कर्नाटक, ओडिशा, तामिळनाडू, सिक्कीम, आसाम आणि आंध्र प्रदेशमध्ये बँक सुट्टी असेल.

जानेवारी महिन्यात 16 दिवस बँका राहणार बंद

1 जानेवारी – नवीन वर्ष

2 जानेवारी – नवीन वर्षाचा उत्सव

7 जानेवारी- रविवार

11 जानेवारी – मिशनरी दिवस

13 जानेवारी- दुसरा शनिवार

14 जानेवारी- रविवार

15 जानेवारी- उत्तरायण पुण्यकाल/मकर संक्रांती/माघ संक्रांती/पोंगल/माघ बिहू

16 जानेवारी- तिरुवल्लुवर दिवस

17 जानेवारी- उजावर तिरुनाल/श्री गुरु गोविंद सिंग यांचा जन्मदिन

21 जानेवारी- रविवार

22 जानेवारी- इमोइनू इराप्टा

23 जानेवारी- गान-नगाई

25 जानेवारी- थाई पूसम/मोहम्मद हजरत अली जयंती

26 जानेवारी – प्रजासत्ताक दिन

27 जानेवारी- चौथा शनिवार

28 जानेवारी- रविवार

च्या वेबसाईटला भेट देऊन तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी देखील पाहू शकता. यासाठी तुम्ही या https://rbi.org.in/Scripts/HolidayMatrixDisplay.aspx लिंकवर जा.

2024 या नवीन वर्षामध्ये रविवार आणि शनिवार वगळत इतर अनेक दिवस बँका बंद राहणार आहेत. रिझर्व्ह बँकेने पुढील वर्षीच्या बँकाच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीप्रमाणे पुढील 50 दिवस बंद राहणार आहेत. तुम्ही घरबसल्या नेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंगद्वारे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकता. पैसे काढण्यासाठी एटीएमचा वापर केला जाऊ शकतो.

First Published on: January 15, 2024 1:32 PM
Exit mobile version