Baramulla Encounter: जम्मू-कश्मीरमध्ये चकमकीत लश्कर ए तोयबाचे चार दहशतवादी ठार

Baramulla Encounter: जम्मू-कश्मीरमध्ये चकमकीत लश्कर ए तोयबाचे चार दहशतवादी ठार

जम्मू कश्मीर पोलिसांनी दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला, एकास अटक

जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवादी पुन्हा सक्रिय झाले आहेत. बारामुला मध्ये आज पहाटेपासून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली असून यात लश्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचे चार दहशतवादी ठार झाले आहेत. तर तीन जवानांसह एक नागरिक यात जखमी झाला आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुरक्षा दलाच्या गोळीबारात ठार झालेल्या तीन दहशतवाद्यांमधील युसूफ कांतरु या दहशतवाद्यांवर १२ लाखाचे बक्षिस ठेवण्यात आले होते. गेल्या महिन्यात बडगाममध्ये एका पोलीस अधिकाऱ्याची आणि त्याच्या भावाची हत्या करण्यात आली होती. त्यात कांतरुचाही सहभाग होता . तेव्हापासून सुरक्षा दल आणि जम्मू-कश्मीर पोलीस त्याचा शोध घेत होते.

बारामुला जिल्ह्ायतील मालवा भागात दहशतवादी लपल्याची माहिती स्थानिक पोलीस सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानंतर पोलीस आणि सुरक्षा दलाने संयुक्त शोध मोहिम सुरू केली. यादरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यास सुरक्षा दल आणि पोलिसांनीही चोख प्रत्युत्तर दिले. यावेळी उडालेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश मिळाले. तर या गोळीबारात तीन जवानांसह एक नागरिक जखमी झाला आहे.

दरम्यान, लवकरच अमरनाथ यात्रा सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर दहशतवाद्यांनी यात्रेत व्यत्यय आणण्याची धमकी दिली आहे.

 

 

First Published on: April 21, 2022 1:33 PM
Exit mobile version