भाजप प्रवेश टाळल्याने गांगुलीची BCCIच्या अध्यक्षपदी पुन्हा नियुक्ती करण्यास नकार; तृणमूल काँग्रेसचा गंभीर आरोप

भाजप प्रवेश टाळल्याने गांगुलीची BCCIच्या अध्यक्षपदी पुन्हा नियुक्ती करण्यास नकार; तृणमूल काँग्रेसचा गंभीर आरोप

यंदाची बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची निवडणूक विशेष असणार आहे. कारण बीसीसीआयने सौरव गांगुलीची अध्यक्षपदी पुन्हा नियुक्ती करण्यास नकार दिला आहे. मात्र बीसीसीआयचा नकारावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. सौरभ गांगुलीच्या अध्यक्षदावरून पश्चिम बंगालमधील राजकीय पक्षांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे. 2021 मध्ये पश्चिम बंगालमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत सौरभ गांगुलीने भाजपाला नाही म्हणाला, त्यामुळे त्याची पुन्हा नियुक्ती करण्यास नकार दिल्याचा, असा आरोप या पक्षांकडून केला जात आहे. (BCCI Sourav Ganguli Bjp Tmc Cpm Congress)

“सौरव गांगुली यांच्याशी भाजपात प्रवेश करण्याबाबत चर्चा करण्यात आली होती. त्यावेळी मात्र गांगुलीने त्यास नकार दिला होता. त्यानंतर 2021 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आणि नंतर भाजपाने गांगुलीच्या नावाचा वापर केला. मग, गांगुलीला दुसऱ्यांदा बीसीसीआयचा अध्यक्ष का? बनवले जात नाही. भाजपा सौरव गांगुलींचा अपमान करत आहे”, असा आरोप तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी केला.

पश्चिम बंगालमध्ये 2021 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाने तृणमूल काँग्रेसविरुद्ध गांगुलीला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून उतरवण्याची तयारी केली होती. शिवाय, त्यावेळी गांगुलीला भाजपा आणि तृणमूल कॉंग्रेस या दोन्ही पक्षाकडून पक्षात प्रवेश करण्यासाठी प्रचंड राजकीय दबाव असल्याने त्याने राजकारणापासून लांब राहण्याच्या निर्णय घेतला होता. तसेच, या विधानसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला होता.

दरम्यान, मे महिन्यात अमित शाह यांनी सौरव गांगुलीच्या घरी भेट देत जेवणाचा आस्वाद घेतला होता. त्यामुळे गांगुली भाजपात प्रवेश करणार असल्याचा चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले होते. मात्र, काही दिवसांनी गांगुलीने नबन्ना येथे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. तसेच, तृणमूलने आयोजित केलेल्या ‘युनेस्को धन्यवाद रॅली’त सहभाग घेतला होता. त्यामुळे भाजपाच्या प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम लागला.

बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा 18 ऑक्टोबरला होणार असून त्याच दिवशी मंडळाची निवडणूक पार पडणार आहे. तसेच, यंदा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) अध्यक्षपदी रॉजर बिन्नी यांची निवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रॉजर बिन्नी हे 1983च्या ऐतिहासिक विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे सदस्य आहेत.


हेही वाचा – धक्कादायक! पाकिस्तानात रुग्णालयाच्या छतावर सापडले 200 हून अधिक मृतदेह

First Published on: October 15, 2022 11:06 AM
Exit mobile version