QR Code स्कॅन करताना राहा अलर्ट नाहीतर अकाऊंट होईल रिकामे

QR Code स्कॅन करताना राहा अलर्ट नाहीतर अकाऊंट होईल रिकामे

ऑनलाइन फ्रॉडचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. यामुळे लोकांना नेहमी सावध राहण्याचा सल्ला दिला जातो. अशातच आता QR Code Scam देखील सुरु झाला आहे. यामध्ये जेव्हा तुम्ही QR Code स्कॅन करणार त्यावेळी स्कॅमर्सच्या अकाऊंटमध्ये तुमचे पैसे जमा होतात. याआधी देखील अनेक सिक्योरिटी रिसर्च फर्मकडून याबाबत रिपोर्ट देण्यात आला होता.

QR Code Scam नवीन नाही. याआधी अनेकदा OLX वर देखील अनेक लोकांना या स्कॅमचा सामना करावा लागला आहे. नुकत्याच समोर आलेल्या एका रिपोर्ट्सनुसार एका महिलेने काही सामान विकण्यासाठी OLX वर यादी केली होती. ते सामान खरेदी करण्यासाठी स्कॅमरने तिला लगेच मॅसेज केला. तो स्कॅमर ते सामान आहे त्या किंमतीमध्ये खरेदी करण्यास तयार होता. त्यानंतर त्याने त्या महिलेला व्हॉट्सअॅपवर QR कोड पाठवला. त्यावेळी त्याने त्या महिलेला सांगितलं की, त्याला सामानाचे पैसे वाठवायचे आहेत. त्यासाठी पेमेंट रिसीव्ह करण्यासाठी Phonepe किंवा GPay ने कोड स्कॅन करा आणि UPI देखील एंटर करा.

त्याच्या सांगण्यानुसार, त्या महिलेने Code स्कॅन केले आणि तिच्या अकाऊंटवरील सर्व पैसे स्क्रॅमरच्या अकाऊंटमध्ये जमा झाले. याबाबत सायबर क्राईममध्ये रिपोर्ट देखील करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त QR Code वरुन आणखी एक फ्रॉड केला जातो. जिथे स्कॅमर सार्वजनिक ठिकाणी दुकानांमध्ये लावलेल्या QR Codeला आपल्या QR Code वरुन बदलतो.

अशामुळे पैसे स्कॅमरच्या अकाऊंटमध्ये जातात. शिवाय ही गोष्ट खूप वेळाने समजते. त्यामुळे कधीही दुकानामध्ये पेमेंट करताना जेव्हा तुम्ही QR Code स्कॅन कराल त्यावेळी दुकानाचे नाव एकदा नक्की पाहा आणि मगच पेमेंट करा.

 

 

First Published on: November 21, 2022 2:27 PM
Exit mobile version