‘बाबरी मशीद होती आणि राहील’, असदुद्दीन औवेसींचे ट्विट

‘बाबरी मशीद होती आणि राहील’, असदुद्दीन औवेसींचे ट्विट

असदुद्दीन औवेसी

राम मंदिर भूमिपूजनासाठी अयोध्यानगरी अखेर सजली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी मंदिराची पायभरणी होणार आहे. या सोहळ्याच्या आधीच एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी एक ट्विट केले आहे. त्यात ते म्हणाले आहेत की, ‘बाबरी मशीद होती आणि राहील इंशाअल्लाह’. ओवैसी यांनी हे ट्वीट करताना बाबरी मशीद आणि बाबरी मशीद विध्वंस केल्याचा एक-एक फोटो शेअर केला आहे.

अयोध्येत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्री राम मंदिर भूमिपूजन होणार आहे. या सोहळ्यानिमित्त अयोध्येत लखलखती विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तर या सोहळ्यानिमित्त रस्तोरस्ती स्वागतांचे फलक, भजन आणि रामाचा गरज सुरु आहे. दरम्यान, राम मंदिर भूमिपूजनासाठी अयोध्यानगरी सजली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी मंदिराची पायभरणी होणार आहे.

दरम्यान, अयोध्येत राम मंदिराचा भूमीपूजन सोहळ्याच्या समर्थनार्थ काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी ट्वीट केले आहे. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी लिहिले आहे की, ‘साधेपणा, धैर्य, संयम, त्याग, वचनबद्धता, दीनबंधू राम नावाचा अर्थ आहे. राम सर्वांमध्ये आहे. राम सर्वांसोबत आहे. भगवान राम आणि देवी सीता यांचा संदेश आणि त्यांच्या आशीर्वादासोबत प्रभू रामाच्या मंदिराच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम राष्ट्रीय एकता, बंधुत्व आणि सांस्कृतिक मेळावात सहभागी व्हा.’


हेह वाचा – Ayodhya Ram Mandir Live : आज श्रीराम जन्मभूमीवर भूमिपूजनाचा सोहळा


First Published on: August 5, 2020 9:17 AM
Exit mobile version