LockDown: या राज्यात कन्टेन्मेंट झोन वगळता २१ मेनंतर उघडणार मोठी दुकानं

LockDown: या राज्यात कन्टेन्मेंट झोन वगळता २१ मेनंतर उघडणार मोठी दुकानं

देशात लॉकडाऊन ४.० सुरू असतानाच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी २१ मे नंतर राज्यात मोठे शॉप्स आणि बस सेवा सुरू करण्याची परवानगी दिली आहे. काल १७ मे रोजी लॉकडाऊन ३.० समाप्त झाला. दरम्यान, केंद्र सरकारने लॉकडाऊन ४ ची घोषणी करत त्या त्या राज्यांना नियमावली काढण्यास सांगितली. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये दुकांन उघडण्याचा महत्त्वाच निर्णय घेण्यात आला. मात्र कन्टेन्मेंट झोनमध्ये कोणत्याही सवलत दिलेल्या नाहीत.

हेही वााचा – Samsung Galaxy A11 आणि A31 स्मार्टफोन लाँच; जाणून घ्या फीचर्स

या सेवांनाही मिळाली परवानगी 

लॉकडाऊन ४ च्या पहिल्याच दिवशी पश्चिम बंगाल सरकारने हा मोठा निर्णय जाहीर केला आङे. तसेच २७ मेपासून रिक्षादेखील सुरू करण्यात येणार आहेत. मात्र एका रिक्षामध्ये दोनच जणांना बसण्याची परवानगी असणार आहे. गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे बंद असलेली शहर आता हळूहळू पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहेत. मुख्यमंत्री ममत बॅनर्जी यांनी जिल्ह्यांतर्गत बससेवाही २१ मेपासून सुरू करणार असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, सलून आणि पार्लर हे पूर्णपणे सेनिटाईज केल्यानंतरच उघडले जातील. सरकारने हेही स्पष्ट केले की केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राज्यात मात्र रात्रीच्या वेळी कर्फ्यू लावला जाणार नाही. नियमानुसार सायंकाळी ७ ते सकाळी ७ च्या दरम्यान लोकांना घराबाहेर पडण्यास मनाई आहे.

First Published on: May 18, 2020 5:34 PM
Exit mobile version