Covid pandamic: पर्यटनस्थळांवरील गर्दीला आवर घाला, केंद्राच्या राज्यांना सूचना

Covid pandamic: पर्यटनस्थळांवरील गर्दीला आवर घाला, केंद्राच्या राज्यांना सूचना

प्रातिनिधीक फोटो

देशात कोरोनाचा कहर गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. यासह देशात कोरोनाच्या संसर्गाची दुसरी लाटच अद्याप ओसरली नसल्याने बऱ्याच पर्यटनस्थळांवर होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण मिळवणं आवश्यक आहे. पर्यटकांच्या या वाढत्या गर्दीवर नियंत्रण मिळाले नाही तर देशात होणाऱ्या गंभीर परिणामांना तोंड द्यावे लागू शकते. परिणामी कोरोनाच्या संसर्गाची बाब लक्षात घेऊन विविध राज्यांनी उत्साही पर्यटकांना वेळीच आवर घालावे, अशी सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने दिली आहे. आज कोरोना संसर्गाची स्थिती आणि लसीकरण याचा आढावा गृहसचिव अजय भल्ला घेण्यासाठी विविध राज्यांच्या मुख्य आणि गृहसचिवांबरोबर उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली.

मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत भल्ला यांनी हिमाचल प्रदेश व काही राज्यांमध्ये पर्यटन स्थळांवर होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेता काही उत्साही पर्यटकांकडून कोरोनाच्या नियमांचे पालन होत नसल्याचे समोर आले आहे. यावेळी ही वाढती गर्दी बघता जर त्यांनी ही वाढती गर्दी त्वरित नियंत्रणात आणली नाही तर त्याच्या गंभीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते, असा इशारा दिला आहे. तसेच, राज्यांनी कोरोनाच्या चाचण्या वाढवाव्यात तसेच बाधितांवर देखील उपचार करावेत. कोरोनाची दुसरी लाट दुसरी लाट अद्याप संपली नाही. त्यामुळे कोरोना लसीकरणाचा वेग देखील वाढवला पाहिजे असे त्यांनी सांगितले.

दरम्यान गृह सचिवांच्या अध्यक्षतेखालील या बैठकीत राष्ट्रीय लसीकरण मोहिमेचादेखील आढावा घेण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, विशेषतः महाराष्ट्र, गोवा, हिमाचल प्रदेश, केरळ, राजस्थान, तमिळनाडू, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढीचा दर अजूनही कायम असून तो दहा टक्क्यांच्या पुढे असून त्यांनी विशेष काळजी घ्यावी. अशी सूचना संबंधित राज्य सरकारांना केली. गृहसचिवांनी यावेळीआगामी काळात केंद्र सरकारकडून राज्यांना लशींचा मोफत पुरवठा वाढविण्यात येईल, त्यामुळे राज्यांनी आपली मागणी अगोदर नोंदवावी असे त्यांनी सांगितले.

First Published on: July 11, 2021 6:19 PM
Exit mobile version