कोवॅक्सिनचे साईड इफेक्ट दिसले तर नुकसान भरपाई देणार, Bharat Biotech ची मोठी घोषणा

कोवॅक्सिनचे साईड इफेक्ट दिसले तर नुकसान भरपाई देणार, Bharat Biotech ची मोठी घोषणा

खूशखबर! २२ नोव्हेंबरपासून 'कोवॅक्सिन'ला ब्रिटनमध्ये मान्यता, कोणत्याही निर्बंधांशिवाय करता येईल प्रवास

कोरोना व्हायरसविरोधात लस तयार करणाऱ्या भारत बायोटेक या कंपनीने भारतीयांसाठी अतिशय दिलासा देणारी अशी घोषणा केली आहे. कोरोनाच्या लसीकरणामुळे जगभरात साईड इफेक्ट्स समोर येत असतानाच आज झालेल्या घोषणेमुळे भारतीयांच्या कोरोना लस वापरासाठीचा विश्वास आणखी वाढणार आहे. लसीकरणानंतर कोणतेही गंभीर दुष्परिणाम हे साईड इफेक्ट्सच्या रूपात दिसून आले तर त्यासाठीचा मोबदला हा कंपनीकडून देण्यात येईल असे कंपनीने स्पष्ट केले आहे. भारत बायोटेकला भारत सरकारमार्फत एकुण ५५ लाख रूपयांची कोरोना लशींची ऑर्डर मिळाली आहे.

भारत बायोटेकने जाहीर केलेल्या परिपत्रकात कोरोना लस घेतल्यानंतर काही गंभीर दुष्परिणाम दिसल्यास मोबदला देणार असल्याची बाब स्पष्ट केली आहे. सरकारी मान्यताप्राप्त केंद्र किंवा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी लागणार संपुर्ण खर्च हा भारत बायोटेक (बीबीआईएल) मार्फत करण्यात येईल. शरीरावर होणारा कोणत्याही साईड इफेक्टसाठीच्या खर्चाची संपुर्ण जबाबदारी भारत बायोटेक घेणार असल्याचे स्पष्टीकरण कंपनीने या परिपत्रकात दिले आहे.

भारत बायोटेकने पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात भारत बायोटेकच्या लसीने कोरोनाविरोधात एंटीडोट तयार करण्याची क्षमता असल्याचे संशोधन मांडले आहे. सध्या तिसऱ्या टप्प्यात या कोरोना लसीची चाचणी होत असून लशीच्या परिणामकारकतेबाबतचा अभ्यास हा डेटाच्या आधारावर केला जात आहे.


 

First Published on: January 16, 2021 5:42 PM
Exit mobile version