Corona Vaccination : कोविशिल्ड नंतर आता भारत बायोटेकच्या कोवॅक्सीनचे नवे दर जाहीर

Corona Vaccination : कोविशिल्ड नंतर आता भारत बायोटेकच्या कोवॅक्सीनचे नवे दर जाहीर

कोविशिल्ड नंतर आता भारत बायोटेकच्या कोवॅक्सीनचे नवे दर जाहीर

सीरम इन्स्टिट्यूटने कोविशिल्ड लसीचे नवे जाहीर केल्यानंतर आता भारत बायोटेकने देखील कोवॅक्सीन लसीचे नवे दर जाहीर केले आहेत. राज्यांना कोवॅक्सिनचा एक डोस आता ६०० रुपयांना मिळणार आहे, तर खासगी रुग्णालयांना १२०० रुपयांना मिळणार आहे. तर केंद्र सरकारला कंपनी केवळ १५० रुपयांनी विकणार आहे. लसींच्या नव्या दरामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

भार बायोटेकने नवे दर जाहीर करताना केंद्र सरकारच्या सूचनांनु,सार नवे दर जाहीर करत आहोत. त्यामुळे सीरम इन्स्टिट्यूटने कोविशिल्ड लसीचे नवे जाहीर केल्यानंतर केंद्र आणि राज्यांमध्ये वाद सुरु असताना आता बायोटेकने नवे दर जाहीर केले आहेत. यामुळे लसींच्या दरावरुन केंद्र आणि राज्यांमध्ये वाद होतो की काय हे पाहावं लागेल. भारत बायोटेक राज्यांना ६०० रुपयांनी लस विकणार आहे. तसंच खासगी रुग्णालयांना १२०० रुपयांनी विकणार आहे. तर केदंराला १५० रुपयांनी लस विकणार असून निर्यात शुल्क १५ ते २० डॉलर एवढं ठेवलं आहे.

सिरमच्या कोविशिल्डचे देखील दर वाढले

सिरमच्या कोविशिल्ड लसीचे नवे दर जाहीर दोन दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आले. आत्तापर्यंत १५० रुपयांमध्ये कोविशिल्ड लसीचा एक डोस सरकारला घ्यावा लागत होता. आता तीच किंमत राज्य सरकारांसाठी ४०० रुपये प्रतिडोस इतकी होणार असून खासगी रुग्णालयांसाठी ती किंमत ६०० रुपये प्रतिडोस असणार आहे.

 

First Published on: April 24, 2021 10:55 PM
Exit mobile version