मोठ मोठ्या कार्यक्रमात चोरी करणारा ‘प्रोफेशनल चोर’

मोठ मोठ्या कार्यक्रमात चोरी करणारा ‘प्रोफेशनल चोर’

मोठ्या कार्यक्रमात केल्या चोऱ्या करणारा मास्टरमाईंड अस्लम

एखादया मोठ्या कॉन्सर्टला किंवा कार्यक्रमादरम्यान तुमचा मोबाईल फोन, वॉलेट किंवा किंमती वस्तू हरवल्या असतील तर कदाचित ‘या’ प्रोफेशन चोरांनी तुमच्या या वस्तू लंपास केल्या असतील आणि तुम्हाला कळाले देखील नसेल.  या चोरांकडून तब्बल ५ हजार महागडे फोन जप्त करण्यात आले असून या चोरीमागील मास्टरमाईंट अस्लम खान (३८), त्याचा सहकारी मुकेश कुमार (२३) यांच्या मुसक्या जगन्नाथ पुरी यात्रेवरुन परतताना पोलिसांनी आवळल्या आहेत.

अशी करायचा चोरी

मुंबईत झालेली जस्टिन बीबरची कॉन्सर्ट असू दे किंवा पंतप्रधान मोदींच्या रॅली या रॅलीला अस्लम खान आणि त्याची टोळी असायची. या गर्दीत कोणाची कोणती वस्तू चोरायची हे आधीच ठरलेले असायचे. खचाखच भरलेल्या कार्यक्रमांच्या जागी जाऊन लोकांच्या खिशातील वॉलेट, मोबाईल फोन आणि अन्य महागड्या वस्तू बेमालुमपणे चोरायचे. देशातील वेगवेगळ्या मोठ्या कार्यक्रमांमध्ये त्यांनी चोरी केल्याची माहिती पोलिसांना दिली आहे.

चोरीचे फोन विकणार असल्याची लागली खबर

कार्यक्रमांमध्ये होणाऱ्या चोऱ्यांसंदर्भातील अनेक तक्रारी पोलिसांना मिळाल्या होत्या. त्यानुसार पोलिसांचा तपास सुरु होता. चोरलेले मोबाईल फोन विकण्यासाठी काही माणसे दिल्लीतील माजुपूर परिसरात येणार असल्याची खबर पोलिसांना लागली. त्यानुसार काही माणसे फोन विकायला आली. आणि पोलिसांनी त्यांना पकडले. त्यावेळी त्यांच्याकडे ४८ महागडे फोन सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली. या सोबतच पोलिसांना पिस्तुल आणि काडतुसे देखील सापडली.

चोरांना द्यायचा पगार

अस्लम खान या चोराची ही आयडिया असली तरी त्याला एकट्याला इतकी चोरी करणे शक्य नव्हते. म्हणूनच त्याने त्याची टोळी तयार केली. त्याने आणखी ५ भुरट्या चोरांना चक्क ४० हजार महिना पगारावर ठेवले होते. त्यामुळे चोरी आणि पगार असे दोन्ही खाऊन अस्लमसह त्याची टीम गब्बर झाली होती.

अशी सुचली अस्लमला आयडिया

अस्लमलची अधिक चौकशी केल्यानंतर तो सराईत पाकिटमार असल्याचे कळाले. १९९५ पासून तो पाकिटमारी करत असून त्याला काहीतरी मोठे करायचे होते. एकदा टीव्हीवर एका लाईव्ह कॉन्सर्टमधील गर्दी पाहिली आणि तरुणांनी हातात पकडलेले महागडे फोन पाहिले आणि मग या कॉन्सर्टमध्ये जाऊन चोरी करायला सुरुवात केली.

पाकिटमारचा झाला प्रोफेशनल चोर

देशात होणाऱ्या अशा मोठ मोठ्या कार्यक्रमांना अस्लमची टीम विमानाचे फर्स्ट क्लासचे तिकीट काढून जायची. चोरी केल्यानंतर बायरोड प्रवास करायची. एकावेळी किमान ५० ते ६० मोबाईल फोन चोरण्यात त्यांचा हातखंडा होता. या कार्यक्रमात संशयास्पद दिसू नये म्हणून ते सगळे टिपटॉप बनून जायचे. त्यामुळे महागड्या वस्तूंसोबत त्याच्यांकडे महागडे कपडे, बूट असे सामान देखील मिळाले आहे.

आतापर्यंत या ठिकाणी केल्या चोऱ्या

दिल्ली
मुंबई
गोवा
ओडिसा
First Published on: July 20, 2018 11:41 AM
Exit mobile version