चीनला धक्का! अमेरिका, जपानसोबत व्यावसायिक संबंध जोडण्याची भारताला सुवर्णसंधी

चीनला धक्का! अमेरिका, जपानसोबत व्यावसायिक संबंध जोडण्याची भारताला सुवर्णसंधी

मोदी ट्रम्प भेट

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चीनवर नाराज असलेल्या देशांसोबत व्यावसायिक संबंध जोडण्याची भारताकडे ही नामी संधी असून त्या दृष्टीने आता पावलं उचलण्याची तयारी केंद्राकडून सुरू आहे. कोरोना व्हायरस हा चीनच्या वुहान शहरातील लॅबमधून आला असल्याचे ठाम मत मांडणाऱ्या अमेरिका आणि जपान या देशातील कंपन्यांना आता भारताकडे वळवण्याची हीच योग्य वेळ असल्याचे सांगत तसे प्रयत्न केंद्राकडून केले जात असल्याची माहिती समोर येत आहे.

परदेशी कंपन्या चीनमधून बाहेर पडण्याच्या तयारीत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल विविध राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या चर्चेत म्हटले होते की, भारत का कोरोनाच्या संकटात मॅन्युफॅक्चरींगसाठी चीनला पर्याय बनू शकतो. त्या दृष्टीने राज्यांची आपल्याकडे उत्पादनाची तयारी ठेवायला हवी. येत्या काळात चीनमध्ये काम करणाऱ्या परदेशी कंपन्यांना भारताकडे वळवण्याची दाट शक्यता आहे. यासाठी देशाने सज्ज करायला हवे. भारतात कामगारांची, नोकरदारांची कमतरता नाही. मात्र रोजगार उपलब्ध झाल्यास बहुतांश लोकांना काम मिळू शकेल. तेव्हा या परदेशी कंपन्या चीन आणि अमेरिकेमधील शीतयुद्धाला तसेच चीनने कोरोना पसरवल्याचा ठपका असल्यामुळे तिथून बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत. अशावेळी भारताकडे ही सुवर्णसंधी आहे.

राज्याला दिले उत्पादन क्षमता वाढवण्याचे संकेत 

यासंबंधी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी राज्यातील तंत्र विभाग मंत्र्यांना सुचना दिल्या असून चीनच्या सद्यस्थितीचा फायदा भारताला मिळू शकतो, याचे संकेत दिले आहेत. राज्याला आता इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरींगची तयारी सुरू करायला हवी. केंद्राने यापूर्वीच इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरींगसाठी इंसेन्टिवची घोषणा केली असल्याचेही रविशंकर प्रसाद यांनी नमूद केले.

हेही वाचा –

खळबळजनक! मोबाईल पाहताच आला कोरोनाचा अलर्ट

First Published on: April 28, 2020 11:45 PM
Exit mobile version