China Lockdown: ओमिक्रॉनच्या सब-व्हेरिएंटने वाढवली डोकेदुखी; चीनमध्ये आतापर्यंत सर्वांत मोठा लॉकडाऊन

China Lockdown: ओमिक्रॉनच्या सब-व्हेरिएंटने वाढवली डोकेदुखी; चीनमध्ये आतापर्यंत सर्वांत मोठा लॉकडाऊन

China Lockdown: ओमिक्रॉनच्या सब-व्हेरिएंटने वाढवली डोकेदुखी; चीनमध्ये आतापर्यंत सर्वांत मोठा लॉकडाऊन

भारत सध्या कोरोनामुक्त होण्याचा दिशेने जात आहे. भारतात बरीच गावं कोरोनामुक्त झाली आहेत. सध्या भारतात कोरोनाचे १५ हजार ३७८ सक्रीय रुग्ण आहेत. पण दुसऱ्या बाजूला ओमिक्रॉनच्या सब-व्हेरिएंट BA2ने जगातील काही देशांची डोकेदुखी वाढली आहे. BA2 या सब-व्हेरिएंटच्या फैलावामुळे फ्रान्समधील रुग्णालयात रुग्णांच्या उपचारासाठी जागाच नाहीये. तर जर्मनीची चिंताजनक परिस्थिती झाली आहे. चीनच्या शांघाईमध्ये दोन वर्षातील सर्वात मोठा लॉकडाऊन लावण्यात आला आहे.

चीन सध्या कोरोनाच्या नव्या लाटेचा सामना करत आहे. चीनमधील काही शहरांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आला आहे. देशातील सर्वात मोठा लॉकडाऊन शांघाईमध्ये लावण्यात आला आहे. येथे माणसांसोबत प्राण्यांच्या बाहेर पडण्यावर निर्बंध लावण्यात आल्याचे पहिल्यांदा घडले आहे. शांघाईमध्ये प्राण्यांच्या हालचालींवर बंदी घालण्यात आली आहे. यामुळे चीनमधील लोकांची चिंता वाढली आहे.

दरम्यान चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. स्थानिक प्रशासनाच्या माहितीनुसार, शांघाईमध्ये मंगळवारी ४ हजार ४७७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने लॉकडाऊन अंतर्गत लोकांना घराबाहेर पडण्यास बंदी घातली आहे. फक्त चाचणी करण्याकरिता लोकं घराबाहेर पडू शकतात.

फ्रान्समध्ये गेल्या २४ तासांत २१ हजार ७३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. अशा प्रकारे दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची वाढ होत असल्यामुळे फ्रान्समधील रुग्णालये तुडूंब भरली आहेत. जर्मनीतही दिवसाला २ लाखांहून अधिक रुग्णांची नोंद होत असून ३००हून अधिक रुग्णांचा मृत्यू होत आहे. तसेच दक्षिण कोरियामध्येही दिवसांला लाखो रुग्ण आढळत आहे. ब्रिटनमधील परिस्थितीही बिकट झाली आहे. येथील लाखोहून अधिक कोरोनाबाधित आढळत आहेत.


हेही वाचा – विमान वाहतूक क्षेत्रात 2020 ते 2021 दरम्यान 10 टक्के कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची वेळ : केंद्र सरकार


 

First Published on: March 29, 2022 6:46 PM
Exit mobile version