Video: रानू मंडलनंतर बिहारमधील ‘सनी बाबा’ व्हायरल, इंग्रजीत गाणी गाऊन मागतो भीक!

Video: रानू मंडलनंतर बिहारमधील ‘सनी बाबा’ व्हायरल, इंग्रजीत गाणी गाऊन मागतो भीक!

Video: रानू मंडलनंतर बिहारमधील 'सनी बाबा' व्हायरल, इंग्रजीत गाणी गाऊन मागतो भीक!

कोरोनामुळे सध्या संपूर्ण देशात लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे लोक सध्या घरीच आहेत. अलीकडेच सोशल मीडियावर एक बाबाचा व्हिडिओ धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओमधील बाबा इंग्रजी मध्ये बोलताना आणि गाणे गाताना दिसत आहेत. २०१९ मध्ये रानू मंडल आपल्या आवाजामुळे रात्रोरात्र स्टार झाली. त्यानंतर रानू मंडलने बॉलीवूडमध्ये देखील गाणे गायले. तिला खूप प्रसिद्धी मिळाली. आता त्याप्रमाणे बिहारी मधील ‘सनी बाबा’चा व्हिडिओ व्हायरल होत आहे. भिक मागून आपले जीवन सनी बाबा जगत आहे. पण ते इंग्रजी गाणी गाऊन भीक मागतात.

सनी बाबाचा हा व्हिडिओ ट्विटरवर एका युझरने शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सनी बाबा काही लोकांशी बोलताना दिसत आहेत. दरम्यान ते सांगत आहे की, तुम्ही मला इंग्रजीतून प्रश्न विचारा मी तुम्ही इंग्रजीतून उत्तर देईन. त्यानंतर एका व्यक्तीने विचारले की, बाबा तुम्ही काय करता? सनी बाबाने इंग्रजीमध्ये उत्तर दिले की, मी भीक मागतो. त्यानंतर त्या व्यक्तीने विचारले की, तुम्ही सकाळाचे आणि दुपारचे जेवण कुठे करता? तेव्हा सनी बाबा बोले की, मला जे कोणी काहीही देते त्यात मी त्यात आनंदी असतो. सनी बाबाना इंग्रजी गाणी आणि डान्स खूप आवडतात.

या व्हिडिओमध्ये सनी बाब ‘ही विल हॅव टू गो’ हे गाणे गाताना दिसत आहे. सनी बाबाचा हा व्हिडिओ पाहून लोक हैराण झाले आहेत आणि खूप प्रतिक्रिया करत आहेत. सनी बाबाप्रमाणे रानू मंडल देखील भिक मागून जीवन जगत होती. ती पश्चिम बंगालच्या रेल्वे स्टेशनवर गाणे गाऊन पोट भरत होती. मात्र तिच्या गाणे गातानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर तिचे गानसमाज्ञी लता मंगेशकर यांनी कौतुक केले होते.


हेही वाचा – CoronaVirus: भ्रमनिरास! यावर्षी तरी कोरोनावर लस येणं अशक्य, म्हणाले ब्रिटनचे मंत्री


 

First Published on: April 27, 2020 11:40 AM
Exit mobile version