बिहार निवडणुकीपूर्वी भाजपला झटका; सुशील कुमार मोदी कोरोना पॉझिटिव्ह

बिहार निवडणुकीपूर्वी भाजपला झटका; सुशील कुमार मोदी कोरोना पॉझिटिव्ह

बिहार विधानसभा निवडणूक जवळ आली असून प्रचार सभा जोरजोरात सुरु आहेत. बिहारमध्ये पुन्हा सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप सर्वोतपरी प्रयत्न करत आहे. दरम्यान, आता भाजपसाठी वाईट बातमी समोर आली आहे. बिहारमधील भाजपचा प्रमुख चेहरा आणि उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. सुशील कुमार मोदी यांना पाटणातील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सुशील कुमार यांनी स्वत: ट्विट करुन याबाबतची माहिती दिली आहे.

“मी कोरोना पॉझिटिव्ह आलो आहे. तरी माझ्या प्रकृतीची सर्व परिमाणं सर्वसाधारण आहेत. दोन दिवसांपासून थोडा ताप येत होता. त्यामुळे कोरोना चाचणी केली. तपासणीनंतर अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. मात्र, चांगल्या उपचारांसाठी एम्स पाटणामध्ये दाखल झालो आहे. फुफ्फुसांचं सीटी स्कॅनही नॉर्मल आहे. लवकरच निवडणूक प्रचारासाठी मी हजर असेल,” असं ट्विट सुशील कुमार मोदी यांनी केलं.

 

First Published on: October 22, 2020 4:38 PM
Exit mobile version