परराज्यातून आलेल्यांना मजुरांना क्वारटाईन करणार नाही राज्याने घेतला निर्णय!

परराज्यातून आलेल्यांना मजुरांना क्वारटाईन करणार नाही राज्याने घेतला निर्णय!

स्थलांतरित मजुरांसाठी पश्चिम रेल्वेकडून स्पेशल गाड्यांची घोषणा

परराज्यातून येणाऱ्यांना क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात येत आहे. १४ दिवस त्यांच्यावर नजर ठेवल्यावरच नंतर त्यांना घरी सोडण्यात येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी हे करणं आवश्यक आहे. मात्र एका राज्य सरकारने परराज्यातून येणाऱ्यांसाठी केलेले सर्व क्वारंटाईन सेंटर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय नितीश सरकारने बिहार राज्यात घेतला आहे. आतापर्यंत ५ हजार क्वारंटाईन सेंटरमध्ये १३ लाख लोकांची नोंदणी करण्यात आली आहे. ३१ मे ला सरकारने केलेल्या घोषणेनुसार ब्लॉक स्तरावरची सर्व क्वारंटाईन केंद्रे १५ जूनपासून बंद केली जातील.

आता यापुढे बिहारमध्ये येणारे प्रवासी कामगार, विद्यार्थी किंवा इतर लोकांना क्वारंटाईन केले जाणार नाहीये. बिहार राज्यातील क्वारंटाईन सेंटर १५  जूनपासून बंद करण्यात येणार आहेत. नितीश सरकारने निर्णय घेतला आहे की,  आता जो कोणी परत येईल त्यांची क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यासाठी नोंदणी केली जाणार नाही.

बिहारमध्ये क्वारंटाईनसेंटर जरी बंद करण्यात आले तरी डोर-टू-डोर हेल्थ मॉनिटरींग सुरूच राहणार असल्याची माहिती बिहार आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रधान सचिव सुप्रिया अमृत यांनी दिली.

कोरोना पॉझिटिव्ह लोकांची संख्या वाढली

बिहारमध्ये परत आलेल्या बऱ्याच स्थलांतरित मजुरांमध्ये कोरोनाची लागण झालेल्या लोकांची संख्या वाढली आहे. सोमवारपर्यंत राज्यात कोरोना विषाणूची लागण होण्याचे प्रमाण ३९५० होते, त्यापैकी २७४३ स्थलांतरित आहेत. लागण झालेले सगळे ३ मे नंतर बिहारला आले होते. कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले बहुतेक प्रवासी महाराष्ट्रातून परत आले आहेत. त्याचबरोबर उत्तर प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल आणि तेलंगणा तसेच इतर राज्यामधून परत आलेल्या परप्रांतीयांमध्येही कोरोनाची लागण झाली आहे.


हे ही वाचा – चीन नाही ओ..तर ‘या’ देशाने पसरवला कोरोना जगभर, डॉक्टरांनी केला दावा!


 

First Published on: June 2, 2020 5:39 PM
Exit mobile version