जम्मू काश्मीरमध्ये स्थलांतरित कामगार दहशतवाद्यांच्या टार्गेटवर; बिहारच्या कामगाराची गोळ्या घालून हत्या

जम्मू काश्मीरमध्ये स्थलांतरित कामगार दहशतवाद्यांच्या टार्गेटवर; बिहारच्या कामगाराची गोळ्या घालून हत्या

स्थलांतरित कामगाराची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना जम्मू काश्मीरच्या बंदीपोरामध्ये घडली. या हल्ल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मागील अनेक दिवसांपासून जम्मू काश्मीरमधील हिंदू बांधवांना दहशतवादी टार्गेट करत आहेत. सातत्याने जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून हल्ले केले जात आहेत. (bihar worker shot dead by unidentified gunmen In bandipora of Jammu Kashmir)

मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद अमरेज असे मृत कामगाराचे नाव आहे. बिहारमध्ये राहणार हा रहिवाशी होता. अज्ञाताने केलेल्या या गोळीबारानंतर मोहम्मद जखमी झाला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

“बंदीपोरा येथे दहशतवाद्यांनी मध्यरात्री गोळीबार करत बिहारमधील स्थलांतरित कामगार मोहम्मद अमरेज याला जखमी केले होते. त्याला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण त्याचा मृत्यू झाला”, अशी माहिती काश्मीर झोन पोलिसांनी दिली.

याआधी बिहारमधील स्थलांतरित कामगार १७ वर्षीय दिलखुश कुमार याची हत्या करण्यात आली होती. मे महिन्यात कुलगाम जिल्ह्यात एका हिंदू शिक्षकाला गोळ्या घालून ठार करण्यात आले होते.

जम्मू काश्मारीच्या राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी लष्कराच्या तळावर आत्मघाती हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यात भारतीय लष्कराच्या तीन जवावांना वीरमरण आले, तर दोन दहशतवादी ठार करण्यात यश आले होते. राजौरीपासून 25 किमी अंतरावरील भारतीय लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांनी आत्मघाती हल्ल्याचा प्रयत्न केला. या आत्मघाती हल्ल्याच्या कटात दोन दहशतवादी सामील झाले होते. अशी माहिती भारतीय सुरक्षा दलाने दिली.

दहशतवादी हल्ले


हेही वाचा – जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या तळावर आत्मघाती हल्ला; तीन जवान शहीद, दोन दहशतवादी ठार

First Published on: August 12, 2022 2:33 PM
Exit mobile version