बुलेटचा आवाज कमी करा सांगितले; त्यांनी गोळीच झाडली!

बुलेटचा आवाज कमी करा सांगितले; त्यांनी गोळीच झाडली!

Revolutionary man shot dead

मध्यरात्री कर्कश आवाज करणारी गाडी घेऊन झोपमोड करणाऱ्या दोन बाईक चालकांना जाब विचारला म्हणून एका तरुणावर गोळी झाडल्याची धक्कादायक घटना दक्षिण दिल्लीच्या तैमूर नगरमध्ये घडली आहे. रविवारी मध्यरात्री नेहमीप्रमाणे तैमूर नगरचे रहिवासी झोपले होते. त्यावेळी परिसरात बुलेट गाडी घेऊन फेऱ्या मारणाऱ्या दोन बाईकस्वारांमुळे परिसरातील नागरिकांची व लहान मुलांची झोपमोड झाली. याविषयी अब्दूल रहमान या तरुणाने त्या बाईकस्वारांना जाब विचारला असता, त्या तरुणांनी अब्दूलवर गोळी झाडली. अब्दूलला परिसरातील लोकांनी तातडीने तेथील स्थानिक रुग्नालयात दाखल केले. चार दिवसांपासून सुरु असलेल्या उपचारानंतर सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे.

तरुणांनी पळ काढला, रहिवाशांनी नेले रुग्नालयात

बुलेटच्या आवाजाने लोकांची झोपमोड करणाऱ्या अनोळखी तरुणांना अब्दूलने त्यांना थांबवून जाब विचारला, तेव्हा त्यांनी अब्दूलला शिविगाळ करण्यास सुरुवात केली. त्यांच्या परस्परातील वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीत अब्दूलला रस्त्यावर आडवे पाडत त्या तरुणांनी आपल्या खिशातील बंदूक काढून त्याच्या डोक्यावर तीन वेळा गोळी झाडली. त्यानंतर ‘त्या’ दोघी तरुणांनी धूम ठोकली. या हाणामारीत अब्दूल गंभीर जखमी झाला. परिसरातील नागरिकांनी अब्दूलला स्थानिक रुग्नालयात दाखल केले. चार दिवसांपासून सुरु असलेल्या उपचारानंतर सध्या अब्दुलची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

दोघांपैकी एकाला अटक, शोध मोहीम सुरु

रुग्नालयात दाखल केल्यानंतर पोलिसांमध्ये कायदेशीर तक्रार दाखल झाली. पोलिसांनीही तातडीने या तक्रारीवर कारवाई सुरु केली. अखेर, सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने त्या दोघींपैकी एका बाईकस्वाराला अटक करण्यात आले असल्याची माहिती पोलीस उपायुक्त चिन्मय भिसवाल यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिली. शिवाय, दुसऱ्याला पकडण्यासाठी शोध मोहिम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

First Published on: July 13, 2018 5:45 PM
Exit mobile version