मोदी दिल्ली के लिए, तूँ तो हानिकारक है – अरविंद केजरीवाल

मोदी दिल्ली के लिए, तूँ तो हानिकारक है – अरविंद केजरीवाल

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

राजकारणात आरोप प्रत्यारोप हे सुरुच असतात. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत असतात. नुकतेच त्यांनी मोदींविरोधात एक गाणे ट्विट केले आहे. तसेच भाजप दिल्लीचे क्षत्रू असल्याचे ते म्हणाले आहेत. दंगल प्रकरणी आरोपातून मुक्तता झाली असली तरीही दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांच्या अडचणीत वाढ होतांना दिसते आहे. गृहमंत्रालयाने केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय)ला चौकशीचे आदेश दिले असल्याने केजरीवाल यांनी मोदींविरोधात ट्विट केले आहे. जैन यांनी बेकायदेशीर रित्या २०० गुंठे शेतजमीन खरेदी केली आहे. सत्तेत आल्यानंतर त्यांनी बेकादेशीर रित्या जमिन मिळवल्याचा दावा सीबीआय कडून केला जात आहे. सीबीआयने २४ ऑगस्ट २०१७ रोजी ही तक्रार नोंदवली होती. संत्येद्र जैन यांच्या मालकीच्या सहा जागांवर सीबीआयने धाडी टाकल्या होत्या याच बरोबर मनी लॉडरिंगच्या प्रकरणीही त्यांची चौकशी सुरु आहे. म्हणून भाजप आपल्या मंत्र्यांशी बदला घेत असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला.


काय आहे ट्विटमधील मजकूर  

“सत्येंद्र जैन यांनी कच्च्या घरांना पक्के करण्याची योजना तयार केली होती. मात्र केंद्र सरकारने ती पास केली नाही. उलट त्यांच्याविरोधात आरोप नोंदवले. भाजप पक्के घरे बनवण्या  विरोधात आहे. भाजप दिल्ली वाल्यांचे क्षत्रू आहे.मोदी दिल्ली के लिए, तूँ तो हानिकारक है “- दिल्ली मुख्यमंत्री. अरविंद केजरीवाल

First Published on: November 30, 2018 1:05 PM
Exit mobile version