‘भाजप सत्तेसाठी मनोहर पर्रिकरांच्या जिवाशी खेळतंय’

‘भाजप सत्तेसाठी मनोहर पर्रिकरांच्या जिवाशी खेळतंय’

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर

‘भाजपला काहीही करून गोव्यातील सत्ता हातात ठेवायची आहे. त्यासाठी भाजप मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या जीवाशी खेळतंय’ असा खळबळजनक आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोव्यातील माजी प्रमुख सुभाष वेलंगिकर यांनी केला आहे. ‘सध्या मनोहर पर्रिकर यांना विश्रांतीची गरज आहे. पण, त्यानंतर देखील भाजप मनोहर पर्रिकरांवर दबाव टाकत आहे. कारण भाजपला गोव्यातील सत्ता गमावायची नाही. त्यासाठी भाजप कोणतीही किंमत मोजेल’ असं वेलिंगकर यांनी म्हटलं आहे. ‘मनोहर पर्रिकर यांच्या जागी दुसरा मुख्यमंत्री आणल्यास सत्ता कायम राखणं भाजपला अवघड जाईल. त्यामुळे भाजप सध्या जपून पावलं उचलत आहे’. असं देखील सुभाष वेलंगिकर यांनी म्हटलं आहे. दरम्यान, सुभाष वेलंगिकरांचे हे विधान भाजपचे गोवा प्रमुख विनय तेंडुलकर यांनी खोडून काढले आहे. ‘मनोहर पर्रिकर यांच्यावर पक्षाचा कोणताही दबाव नाही. पर्रिकरांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत असून नोव्हेंबरपासून पर्रिकर ऑफिसला येतील.’ असं विनय तेंडुलकर यांनी म्हटलं आहे. मागील काही दिवसांपासून पर्रिकर याची तब्येत बिघडली आहे.

वाचा – मनोहर पर्रिकरांची प्रकृती स्थिर; गोव्यात नेतृत्व बदल नाहीच

गोव्यात नेतृत्व बदल

पर्रिकरांच्या तब्येतीमध्ये बिघाड झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी अमेरिकाला हलवण्यात आलं. पण, काही दिवसामध्ये त्यांच्या तब्येतीमध्ये पुन्हा एकदा बिघाड झाला. परिणामी त्यांना मुंबई आणि नंतर दिल्लीच्या एम्समध्ये हलवण्यात आलं. एम्समधील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सध्या पर्रिकर गोव्यातील घरी आहे. त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होतेय अशी माहिती देखील समोर येत आहे. पण मनोहर पर्रिकर यांची तब्येत खालावत असल्यानं गोव्यात नेतृत्व बदलाची चर्चा जोरात सुरू होती. पण, सध्या तात्पुरता तरी विराम लागला आहे. पण पुढील काळात भाजपचे केंद्रीय नेतृत्व नेमकी काय पावलं उचलणार हे पाहावं लागणार आहे.

वाचा – गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रिकरच असणार – अमित शहा

वाचा – मनोहर पर्रिकरांना एम्समधून डिस्चार्ज; रेड अॅम्ब्युलन्समधून गोव्यात दाखल

 

First Published on: October 25, 2018 3:48 PM
Exit mobile version