भाजप नेत्याची दादागिरी, अपंगाला मारहाण

भाजप नेत्याची दादागिरी, अपंगाला मारहाण

उत्तरप्रदेशमध्ये भाजपच्या स्थानिक नेत्याची दादागिरी समोर आली आहे. मी अखिलेश यादव यांनाच मत देणार असं म्हटल्यानं एका अपंगाला चक्क मारहाण करण्यात आली आहे. दरम्यान, याबाबतचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये अपंग व्यक्तिला काठीनं मारहाण होताना दिसत आहे. मोहम्मद मियाॅ असं या स्थानिक भाजप नेत्याचं नाव असून मियाॅ भाजप नेतृत्वाच्या जवळचे मानले जातात. मारहाण करतानाचा व्हिडीओ संबळ जिल्ह्यातील आहे. हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मोहम्मद मियाॅ मारहाण करत असलेल्या तरूणानं भाजपने केलेल्या कामांवर नाराजी व्यक्त केली. शिवाय, त्यानं मी अखिलेश यादव यांनाच मत देणार असं म्हटलं. परिणामी, राग अनावर झाल्यानं मोहम्मद मियाॅ यांनी सदर व्यक्तिला मारहाण केली. संबळ जिल्ह्या हा मुस्लिमांच्या वर्चस्वासाठी ओळखला जातो.

First Published on: December 25, 2018 7:18 PM
Exit mobile version