गोमूत्र प्यायल्याने कोरोना जातो; भाजप आमदाराचा अजब सल्ला, VIDEO व्हायरल

गोमूत्र प्यायल्याने कोरोना जातो; भाजप आमदाराचा अजब सल्ला, VIDEO व्हायरल

गोमूत्र प्यायल्याने कोरोना जातो; भाजप आमदाराचा अजब सल्ला VIDEO व्हायरल

देशात कोरोना विषाणूचा अक्षरश: थैमान सुरु आहे. या परिस्थितीत अनेक राज्यांमध्ये रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी अत्यावश्यक औषधे, इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. अशातच आपल्या बेताल वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले बलियाच्या बैरिया विधानसभेचे भाजपा आमदार सुरेंद्र सिंह यांनी कोरोनापासून बचाव करण्यासाठी गोमूत्र पिण्याचा सल्ला दिला आहे. बरं ते एवढ्यावर थांबले नाही तर त्यांनी स्वत: गोमूत्र पितानाचा एक व्हिडिओदेखील व्हायरल केला आहे. या व्हिडिओत त्यांनी दररोज गोमूत्रं प्यायल्याने कोरोना होत नाही असे अजब विधान केले आहे. सिंह यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

आमदार सुरेंद्र सिंह अनेकदा बेताल वक्तव्यांमुळे चर्चेत येत असतात. यात शुक्रवारी त्यांनी गोमूत्र पितानाचा एक व्हिडिओ नवीन चर्चांना उधाण आले आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी लोकांनी गोमूत्र प्यावे असा सल्ला दिली आहे. त्यांनी सांगितले की, मी रोज गोमूत्र पित असल्याने अजून ठणठणीत आहे. त्यांनी सल्ला देताना सांगितले की, सकाळी दात घासण्याआधी रिकामी पोटी थंड पाण्यात ५ झाकण गोमूत्र मिसळून प्यावे आणि अर्धा तास काहीच खाऊ नये. असं केल्यास कोरोनाच नाही तर कोणताच आजार तुमचं काहीही बिघडवू शकणार नाही, असा दावा केला आहे. तसेच वैज्ञानिक उपायांपेक्षा हा उत्तम उपाय असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तसेच यामारे वैज्ञानिक तत्व काय आहेत हे मला माहीत नाही. मात्र, गोमूत्र प्राशन करून मी १८- १८ तास नागरिकांसह असतो, असं ते म्हणाले.

सुरेंद्र सिंह यांनी असाही दावा केला की, मी दररोज गोमूत्र पित असल्याने मला अद्यापही कोरोनाची बाधा झालेली नाही. जगालादेखील ही गोष्ट समजायला हवी की गोमूत्राचं सेवन करुन कोरोना आटोक्यात आणणं शक्य आहे.विज्ञानाने त्याचा स्वीकार करो अथवा न करो. विज्ञानाचा एवढा विकास होऊनही लोक या महामारिने मरत आहेत. सर्व काही फेल झालं आहे. अशावेळी मानवाने देवावर विश्वास ठेवून आपल्या पूर्वजांच्या मार्गावर गेलं पाहिजे. गोमूत्राची ही ब़ॉटल ५० रुपयांना मिळत असू दहा दिवस ही बॉटल पुरते. जर तुम्ही बॉटल घेऊ शकत नसाल तर एखाद्या गायीचं गोमूत्रं नियमित प्राशन करा. मी माझा वैयक्तिक अनुभव तुमच्यापुढे ठेवत आहे, असं सिंह यांनी म्हटलं आहे. इतकंच नाही तर कोरोनात अनेकजणांचा हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू होत आहे. गोमूत्राचं सेवन करुन यातून बचाव करता येऊ शकतो.

सुरेंद्र सिंह म्हणाले, खोकला, ताप यांसारख्या आजारांपासून वाचण्यासाठी गायीच्या तुपात हल्दीची पावडर मिसळून ठेवतो व जेव्हा बाहेर दौऱ्यावर जातो कुठेही पाणी पिल्यानंतर हे मिश्रण पितो. यामुळे कोरोनापासून स्वत:चे संरक्षण करता येते  असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

First Published on: May 8, 2021 11:16 AM
Exit mobile version