साक्षी महाराजांचा ‘कोरोना महामारी भगाओ’ यज्ञ; कोरोनाचा नाश होईल असा दावा

साक्षी महाराजांचा ‘कोरोना महामारी भगाओ’ यज्ञ; कोरोनाचा नाश होईल असा दावा

भारतीय जनता पक्षाचे खासदार साक्षी महाराज

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव भारतात दिवसागणीक वाढत आहे. कोरोनाला हरवण्यासाठी अनेकजण वेगवेगळे दावे करत आहेत. आपल्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत असलेले भारतीय जनता पक्षाचे खासदार साक्षी महाराज या दिवसांत कोरोनाचं संकट दुर करण्यासाठी ‘कोरोना महामारी भगाओ’ यज्ञ करत आहेत. या यज्ञामुळे कोरोनासारख्या साथीच्या आजारापासून मुक्तता होईल. या कोरोना साथीचा नाश करण्यासाठी मी प्रार्थना आणि यज्ञ करत आहे, असं खासदार म्हणाले. पुढे म्हणाले की, प्राचीन काळातही महान ऋषी-मुनी असे यज्ञ करत असत. कोणत्याही आपत्ती संकटामध्ये यज्ञ सर्व त्रासांपासून मुक्तता करत असायचे.


हेही वाचा – प्रिन्स चार्ल्स आयुर्वेदिक उपचारांनी बरे झाल्याचा दावा खोटा


आजच्या काळात संपूर्ण जग कोरोना साथीच्या आजाराने ग्रस्त आहे आणि मला खात्री आहे की कोरोना साथीचा रोग दूर करण्यात यज्ञ फायदेशीर ठरेल. कोरोनाविरोधात देशात सध्या सुरू असलेल्या युद्धाविषयी साक्षी महाराज म्हणाले की, कोरोनाविरूद्ध आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या पद्धतीने संपूर्ण देशाला एकत्र केले आहे, त्यावरून आम्हाला आशा आहे की, आपल्या देशातील करोना हा साथीच्या रोगाला हद्दपार करु, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. साक्षी महाराज म्हणाले की, ते नेहमीच पूजा करत असतात. परंतु कोरोनामुळे ते ‘कोरोना महामारी भगाओ’ यज्ञ करत आहेत. त्यांनी दावा केला की यज्ञ केल्याने आजूबाजूला ऑक्सिजन पसरतो, वातावरण शुद्ध होते आणि यामुळे साथीच्या रोगासारख्या कोंडीवर मात करण्यात मदत होईल.

 

First Published on: April 3, 2020 2:22 PM
Exit mobile version