Mucormycosis: Black Fungus वर १०० वर्षे जुने औषध ठरतेय प्रभावी, भारतीय डॉक्टरांचा दावा

Mucormycosis: Black Fungus वर १०० वर्षे जुने औषध ठरतेय प्रभावी, भारतीय डॉक्टरांचा दावा

देशात कोरोना विषाणूचा विस्फोट सुरु असून एका दिवसात लाखोच्या घरात नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. एकीकडे कोरोनाबाधित रुग्ण उपचारांविना जीव सोडत असून दुसरीकडे या रुग्णांना जीवघेण्या ब्लॅक फंगस म्हणजे म्युकोरमायकोसिस आजाराचा धोका निर्माण झाला आहे. अनेक कोरोनाबाधित रुग्णांचा शरीरावर म्युकोरमायकोसिस (Mucormycosis)चे इंफेक्शन वाढत आहे. परंतु यावर आता मध्य प्रदेशमच्या जबलपूरमधील एका डॉक्टराने म्युकोरमायकोसिसवर प्रभावी आणि सोप्पा उपचार करत असल्याचा दावा केला आहे. यासाठी या डॉक्टराने १०० वर्षापेक्षा अधिक जुने औषध सांगितले आहे. हे औषध म्युकोरमायकोसिस (Mucormycosis)वर अत्यंत गुणकारी आणि स्वस्त असल्याचेही डॉक्टराने सांगितले आहे.

गेल्या काही दिवसांपासून मध्यप्रदेशसह महाराष्ट्र आणि आता मुंबईतही म्युकोरमायकोसिस (Mucormycosis) चे रुग्ण आढळत आहेत. यात जबलपूर, भोपाळ, इंदोरमध्येही अनेक कोरोनाबाधित रुग्णांना म्युकोरमायकोसिस इंफेक्शन झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसमोर कोरोनानंतरचे नवे संकट उभे राहिले आहे. कारण हा आजार अनेक रुग्णांसाठी जीवघेणा ठरत असल्याने आरोग्य प्रशासन यावर योग्य उपचार करण्यासाठी प्रयत्न करत आहे. दरम्यान मध्य प्रदेशमधील एका डॉक्टराने या आजारावर स्वस्त आणि प्रभावी उपाय सुचवला आहे.

मध्यप्रदेशच्या जबलपूरमधील डॉ. अमरेंद्र पांडे यांनी या आजारावर प्रभावी उपाय असल्याचे सांगितले आहे. यावर बोलताना डॉ.पांडे सांगतात की, आपल्या खासगी रुग्णालयातील कोरोना रुग्णांना म्युकोरमायकोसिस (Mucormycosis)या ब्लॅक फंगसारख्या आजार झाला आहे. त्यामुळे या भयानक आजारापासून वाचण्यासाठी आम्ही एका प्रभावी औषधोपचार करत आहोत. हे औषध म्हणजे मिथलीन ब्लू.

डॉ. पांडे सांगतात, हे औषध सहज उपलब्ध होत असून ते अँटीफंगल्सवर प्रभावीरित्या काम करत आहेत. हे औषध खाणीत काम करणाऱ्या कामगारांना तसेच गिर्यारोहकांना ऑक्सिजन पातळी वाढण्यासाठी दिले जाते. या औषधाचा अगदी कमी मात्रेतही रुग्णाची ऑक्सिजन पातळी वाढवता येते असून अँटी फंगसचंही काम करत आहे. घरातील फिशटँकमधील माशांना फंगसपासून वाचवण्यासाठी या औषधांचे ड्रॉप टाकले जातात. दरम्यान कोरोना रुग्णांवर करण्यात आलेल्या प्रयोगातही हे औषध प्रभावी ठरले. आपल्या रुग्णालयातील १२ पेक्षा अधिक रुग्णालयांनी या औषधांचा प्रयोग सुरु केला आहे. ज्यामध्ये परिणाम चांगले दिसले असून या औषधांचे दोन डोसचं पुरेसे आहेत.

मात्र व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन सपोर्टवर असणाऱ्या रुग्णांवर या औषधांचा वापर करताना विशेष लक्ष देण्याची गरज भासत आहे. या रुग्णांच्या शरीरात हे औषध पोहोचलणारी व्हेंटिलेटर ट्युब आणि ऑक्सिजन ट्युब वारंवार स्वच्छ करावी लागेले जेणेकरुन फंगस निर्माण होणार नाही आणि रुग्ण सुरक्षित राहिल, असेही डॉ.पांडे म्हणाले.


MPSC EXAM 2021: एपीएससीच्या विद्यार्थ्यांना दिलासा! महापोर्टलवर परीक्षा घेण्यास आयोगाची तयारी


 

First Published on: May 12, 2021 10:47 PM
Exit mobile version