BMW कंपनीने मागवल्या १६ लाख गाड्या परत

BMW कंपनीने मागवल्या १६ लाख गाड्या परत

प्रातिनिधिक फोटो

जगप्रसिद्ध गाड्यांची कपंनी BMW ने तयार केलेल्या १६ लाख गाड्या ग्राहकांकडून पून्हा मागवल्या असल्याचे वृत्त समोर आले आहे. गांड्यामध्ये तांत्रिक बिघाड असल्यामुळे कंपनीने त्या परत मागवल्या असल्याचे सांगण्यात येत आहे. या बिघाडामुळे या गाड्यांमध्ये आग लागण्याची शक्यता होती. BMW ही जर्मनीची कंपनी आहे मात्र जगभरात या कंपनीच्या गाड्या मोठ्या प्रमाणावर वापरल्या जातात. १९१६ मध्ये या कंपनीची स्थापना करण्यात आली होती. आज जर्मनी बरोबरच ब्राझील, चीन, भारत, दक्षिण आफ्रिका, यु.के. आणि यु.एस. या ठिकाणी BMW ची मुख्यालये आहेत. जगातील कार निर्माण करणाऱ्या कंपन्यांमध्ये BMW चा १२ वा क्रमांक लागतो.

गाड्या परत मागवण्या मागचे कारण 

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार ऑगस्ट २०१० ते २०१७ दरम्यान बनवलेल्या गाड्यांना परत मागवण्यात येत आहे. या गाड्यांमध्ये लावण्यात आलेल्या फायर एग्जॉस्ट सिस्टममध्ये बिघाड आढळला. २०१६ मध्ये हा बिघाड कंपनी समोर आला होता. यानंतर BMW कंपनीने युरोप आणि आशिया खंडातील काही भागांमध्ये ४ लाखाहून अधिक विकल्या गेलेल्या  गाड्या परत मागवल्या होत्या. या गाड्यांमध्ये तांत्रिक बिघाड आढळून आला. दक्षिण कोरियामध्ये ३० हून अधिक BMW गाड्यांना आग लागण्याची घटना घडल्या होत्या. यानंतर कंपनीने ग्राहकांची माफी मागत त्यांच्या गाड्या परत घेतल्या. भारतातही कंपनी आपल्या गाड्या परत मागणार असल्याचे सांगण्यात आहे. मात्र BMW चे भारतातील मुख्यालयाकडून अद्याप अशा प्रकाराची अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.

First Published on: November 6, 2018 3:31 PM
Exit mobile version